शेअर बाजार पुन्हा संथ | पुढारी | पुढारी

शेअर बाजार पुन्हा संथ | पुढारी

डॉ. वसंत पटवर्धन

शेअर बाजार  पुन्हा एकदा संथ, शेवाळे असलेल्या डोहासारखा झाला आहे. त्यावर कुठेही तरंग उठलेले दिसत नाही. कारण, जागतिक अगर आपल्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी निर्देशांक 37336 वर तर निफ्टी 11278 वर स्थिरावलेले दिसले. मात्र, गृहवित्त कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत. 

दिवाण हौसिंग फायनान्स 626 रुपयांवर पोहोचला आहे तर रेको होम 628 रुपयांवर आणि इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स 1310 रुपयांवर मिळत आहेत. एस बँकेचे जून 2018 तिमाहीचे आकडे प्रसिद्ध झाले. आकडे उत्तम असूनही शेअर बाजाराने 43 टक्क्यांनी वाढून 8272.18 कोटी रुपये झाले आहे. त्यात कर्जावरील मिळालेले व्याज 6578 कोटी रुपये आहे. अनर्जित कर्जासाठी 625.65 कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर नक्त नफा 30.5 टक्क्यांनी वाढून 1260.36 कोटी रुपये झाला आहे. बँकेचे भागभांडवल 461.14 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2017 मध्ये कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्याच्या भागाचे दोन रुपये दर्शनी मूल्याच्या पाच भागांत विभाजन केले होते. आता या शेअरवरील उपार्जन 5.47 रुपये आहे. जून 2017 साली ते 4.22 रुपये होते. बँकेच्या ठेवीत 41 टक्के वाढ आहे. तिच्या बचत व चालू खात्यातील ठेवी 35.1 टक्के आहेत. तिची ढोबळ व नक्त अनार्जित अनुक्रमे 1.31 टक्के व 0.59 टक्के इतकी कमी आहेत. प्रथम प्रतीचे (ढळशी ख) तिच्या भांडवलाची टक्केवारी 17.3 टक्के आहे. देशभरात तिच्या 1105 शाखा आहेत व 1750 च्यावर ए. टी. एम. आहेत. 

तरीही शुक्रवारी शेअर घसरून 362 रुपयापर्यंत आला. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 394 रुपये व 285 रुपये होते. सध्याच्या भावाला किं./ऊ. गुणोत्तर 20.2 पट दिसते. 340 रुपयापर्यंत हा शेअर आला तर पुन्हा 400 रुपयांच्या लक्ष्यासाठी द्यावा. 

एस बँकेचे 2019 मार्च व 2020 मार्च वर्षासाठीचे नक्त उत्पन्न अनुक्रमे 16425 कोटी रुपये व 20800 कोटी रुपये व्हावे. करोत्तर नफा अनुक्रमे 5340 कोटी रुपये व 7200 कोटी रुपये व्हावा. 

शेअरगणिक उपार्जन या दोन वर्षासाठी 23.25 रुपये व 31 रुपये दिसेल. एस बँकही खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चांगली असली तरीही मुद्दाम येथे जोखीम न घेता अन्य  क्षेत्रातील कंपन्यांकडे विशेषतः गृहवित्त कंपन्यांकडे लक्ष द्यावे. 

निर्देशांकाने आता 37400 चा पल्ला गाठला आहे. बारा महिन्यांपूर्वीचा किमान निर्देशांक 31081 होता. त्यात आतापर्यंत 6288 अंकांची वाढ झाली आहे. ही वाढ 20 टक्के आहे. हेगची किंमत या दोन महिन्यात 3100 वरून 4000 रुपयांवर गेली आहे. ग्राफाईट इंडियाही 1000 रुपयांपर्यंत वर गेला व तो आता 980 रुपयांच्या मागे-पुढे आहे. 

संस्थेमधील अविश्‍वासाच्या ठरावावर सरकारने बाजी मारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत सार्क राष्ट्रांच्या शिखर परिषदेसाठी जोहान्सबर्गला गेले आहेत तर उद्धव ठाकरे रामलल्लाच्या दर्शनासाठी व मनोरंजनासाठी अयोध्या, वाराणसीला गेले आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांनी चीनबरोबरचे व्यापारयुद्ध थोडे शिथिल केले आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळा समाधानकारक व सर्वत्र आहे. त्यामुळे यंदा खरीप पीक उत्तम यावे. 

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बुधवारीरिझर्व्ह बँक आपले त्रैमासिक धोरण जाहीर करील. त्यात रेपोदर पाव टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर बँकाही कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्जावर व्याजदर वाढवतील व त्यामुळे सप्टेंबर व डिसेंबरच्या तिमाहीचे बर्‍याच बँकांचे आकडे समाधानकारक दिसतील. माफक प्रमाणात त्यामुळे कॅनरा बँक, फेडरल बँक, कर्नाटक बँक, विजया बँक, आरबीएल बँक येथेही गुंतवणुकीचा विषय होऊ शकतो. 

निर्देशांकाने आता गेले तेरा महिने सतत वाढ दाखविली आहे. आता ही गती थोडी मंदावेल. तरीही बँकांतील मुदत ठेवीपेक्षा शेअर्समध्ये गुंतवणूक दीर्घ पल्ल्याचा  विचार केला तर आकर्षक ठरेल. 

स्टरलाईट टेक्नोलॉजी, केईसी इंटरनॅशनल, बजाज फायनान्स, जे. कुमार इन्फ्राओपीएल अपोलो (अझङ अिेश्रश्रे) येथे सध्या भाव कमी दिसत असले तर गुंतवणूक इष्ट ठरेल. मात्र, भागभांडवलात जास्तीत जास्त 15 शेअर्स असावेत.

शेअर्स कुठले घ्यावेत, यासाठी अनेक दलाल, विश्‍लेषक आपापली निवड सांगत असतात. तरीही गुंतवणूकदाराने दर तिमाहीचे आकडे बघूनच शेअर्स घ्यायचे (इणध) आहेत, तेच ठेवायचे (कजङऊ) का विकायचे (डएङङ), याचा निर्णय स्वतः अभ्यास करून घ्यायला हवा. 

त्यात काही शेअर्स दोन ते चार वर्षांसाठी, काही एक वर्षासाठी तर काही ‘झट मंगनी, पट शादी’  स्वरुपाचे अल्प मुदतीसाठी असे हवेत. तसेच मोठ्या कंपन्या, मिडकॅप व स्मॉलकॅप या सर्वात भांडाराची विभागणी असावी.

Back to top button