सेबीने सन 2018 मध्ये म्युच्युअल फंडांचे जे अधिकृत वर्गीकरण जारी केले आहे, त्यामध्ये इक्विटी फंडांचे दहा उपप्रकार सांगितले आहेत. Value Fund आणि Contra Fund यांचा अंतर्भाव एकाच उपप्रकारात केला आहे. म्हणजे Contra हे Value फंड असतात, हे सेबी अधोरेखित करू इच्छिते. आता Value फंड म्हणजे कोणते फंड? तर, ज्या फंडामधील गुंतवणूक Fundamentally सशक्त कंपन्यांमध्येच होते, त्यांना Value फंड म्हणतात. कंपनी Fundamentally सशक्त असण्याचे निकष कोणते, याची चर्चा आपण पूर्वी अनेकदा केली आहे.
Contra Fund हे जर Value फंडच असतील, तर त्यांचा वेगळा उपप्रकार बनवण्याचे काय कारण आहे? Contra फंडाचा फंड मॅनेजर गुंतवणुकीसाठी शेअर्स निवडताना Contrarian स्ट्रॅटेजी वापरतो. नावावरूनच आपल्या लक्षात येईल की, Contrarian म्हणजे तो प्रवाहाविरुद्ध किंवा जमावाच्या मानसकिकतेविरुद्ध (Herd Mentality) जाऊन शेअर्स खरेदी करतो.
इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, प्रवाहाविरुद्ध किंवा जमावाच्या मानसिकतेविरुद्ध जाणे म्हणजे चुकीचे निवडणे नव्हे, तर शेअर बाजारात Bad News about Good Companies असा प्रकार वारंवार घडताना दिसतो. अशा वेळी अशा बातम्या वार्याच्या वेगाने पसरतात आणि चांगल्या चांगल्या शेअर्सचे mispricing होऊन ते शेअर्स Undervalued बनतात. Contrarian फंड मॅनेजर अशाच शेअर्सच्या शोधात असतो. कारण त्याचा ठाम विश्वास असतो की, कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असल्यामुळे असे शेअर्स लवकरच वरची दिशा पकडतील.
वॉरन बफे हे Contrarian Strategy चे सर्वात मोठे आणि यशस्वी उदाहरण आहे, हे आपण पाहतोच. कारण यशस्वी गुंतवणुकीचे मर्म म्हणून त्यांचे जे सुप्रसिद्ध वचन सर्वत्र उल्लेखिले जाते, तेच या Strategy चे गमक आहे, Be Fearful when others are greedy and greedy when others are fearful.
भारतामध्येही असे Contra फंड आहेत. त्यांपैकी SBI Contra फंडाची माहिती आज आपण घेऊ. 14 जुलै 1999 रोजी हा फंड बाजारात आला. स्थापनेपासून आजतागायत या फंडाने जवळपास 19 टक्के असा अत्यंत आकर्षक परतावा दिला आहे. या फंडाची ग्रोथ ऑप्शनची आजची छअत आहे रु. 199.21 म्हणजे स्थापनेपासून या फंडातील गुंतवणूक जवळपास 20 पटींनी वाढली आहे. S & p BSE 500 TRI हा फंडाचा बेंचमार्क इंडेक्स आहे. आणि अखंडपणे फंडाने इंडेक्सपेक्षा जादा परतावा दिला आहे. Value Research ने या फंडाला 5-Star रेटिंग दिले आहे. गेल्या 5 वर्षांपासून हा फंड Contra श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मागील 10 वर्षांमध्ये फंडाने खालीलप्रमाणे परतावा दिला आहे.
दिनेश बालचंद्रन हे SBI Contra फंडाचे फंड मॅनेजर आहेत. SBI Long Term Equity Fund, SBI Balanced Advantage Fund SBI Multi Asset Allocation Fund या फंडाचे व्यवस्थापनही तेच पाहतात. एका मुलाखतीत त्यांनी SBI Contra फंडासाठी स्टॉक सिलेक्शन कसे होते, ते सांगितले होते. सेक्टर्स किंवा थीमची निवड करताना Top-Down द़ृष्टिकोन स्वीकारला जातो. म्हणजे जे सेक्टर्स खूप वाईट कामगिरी करत आहे, त्या सेक्टरमधील चांगल्या कंपन्या गुंतवणुकीसाठी निवडल्या जातात. उदा. 2019 मध्ये फार्मा सेक्टर, 2020 मध्ये इंडस्ट्रीअल सेक्टर, तर 2021 मध्ये पॉवर सेक्टर त्यांच्या गुंतवणुकीच्या व्याख्येमध्ये आदर्श होते. अगदी अलीकडची या फंडाची खरेदी पाहिली तर ती टेक महिन्द्र, महिंद्र आणि महिंद्र, अंबुजा सिमेंटस्, बजाज ऑटो, गेटवे द़ृष्टीपार्कस, मदरसन सुमी वायरिंग, बीपीसीएल, रॅलीज् इंडिया, इंडियन बँक या शेअर्समध्ये झालेली दिसून येईल.
एकूण 67 स्टॉक्समध्ये फंडाची गुंतवणूक आहे. फायनान्शिअल, एनर्जी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल वगैरे 16 सेक्टर्समध्ये ही गुंतवणूक विभागलेली आहे. Market-Cap Wise पाहिले तर खालीलप्रमाणे ही गुंतवणूक आहे.
Giant Companies – 27.05%
Large Cap – 21.39%
Mid Cap – 26.15%
Small Cap – 25.15%
वरील अॅलोकेशन पाहता हा खर्या अर्थाने एक मल्टिकॅप, डाइव्हार्सेफाईड फंड आहे, असे म्हणाला हरकत नाही.
SBI Contra फंडाची आतापर्यंतची कामगिरी निश्चितच प्रशंसनीय आहे. परंतु अशा प्रकारचे फंड हे नेहमीच प्रवाहाविरुद्ध पोहत असल्याने ते साहसी गुंतवणूक या प्रकारामध्ये मोडतात. गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता आणि तयारी मध्यम ते दीर्घकालीन थांबण्याची चिकाटी या गोष्टींचा इथे कस लागतो. इथे सर्व काही फंड मॅनेजरचा अनुभव आणि त्याचे Stock Selection चे कौशल्य यावर अवलंबून असते. परंतु ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग किमान पाच वर्षांसाठी अवश्य गुंतवावा.
भरत साळोखे