फिलिप्स कार्बन ब्लॅक | पुढारी | पुढारी

फिलिप्स कार्बन ब्लॅक | पुढारी

यावेळचा ‘चकाकता हिरा’ म्हणून ‘फिलिप्स कार्बन ब्लॅक’ कंपनीची निवड केली आहे. तिचा डिसेंबर 2018 तिमाहीचा नफा, डिसेंबर 2017 तिमाहीपेक्षा 93 टक्के वाढून 109 कोट रुपये झाला आहे. डिसेंबर 2018 तिमाहीची विक्री 946 कोटी रुपयांची होती. ढोबळ नफा दर टनामागे 82 टक्क्याने वाढला.

कंपनीने मुंद्रा येथे 56000 मेट्रिक टन रबर ब्लॅक  उत्पादनाची क्षमता असलेला कारखाना या महिन्यातच सुरू केला आहे. त्यामुळे पुढील काळात विक्री व नफा वाढता राहील. तिच्या पालेज येथील कारखान्याची उत्पादनक्षमता 32000 टन असणार आहे.  पर्यावरणसंबंधीचे काही परवाने प्रलंबित झाल्याने पालेजची उत्पादनक्षमता  नोव्हेंबर 2019 पासून वाढेल. हे उत्पादन सुरू झाले की 2020, 2021 वर्षांचे उत्पादन वाढलेले दिसेल. डिसेंबर 2018 च्या तिमाहीत 1,1917 मेट्रिक टन उत्पादनक्षमता या तिमाहीतच वाढणार आहे. जे. के. टायर्स, अपोलो टायर्स, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, सिएट या सर्व टायर कंपन्यांची विक्री येत्या दोन वर्षात खूप वाढणार आहे. त्यामुळे कंपनी दक्षिण भारतात 600 कोटी रुपये खर्च करून एक नवा कारखाना टाकणार आहे. कंपनीची 2000 मार्च 2018 ला  संपलेल्या वर्षासाठी 2547 कोटी रुपयांची विक्री झाली.

मार्च 2019 व मार्च  2020 या पुढील दोन वर्षांची संभाव्य विक्री 3500 कोटी रुपये व्हावी. 2018 मार्चला संपलेल्या वर्षाचा नक्‍त नफा 230 कोटी रुपये होता. पुढील दोन वर्षांसाठी हा नफा 400 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. मार्च 2018 वर्षासाठी  शेअरमागे उपार्जन 13 रुपये होते. तो आता 24 रुपयांपर्यंत वाढणार आहे. कंपनीच्या शेअरचा भाव सध्या 175  रुपये आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर 13 पट दिसते. हेच गुणोत्तर पुढील दोन वर्षे कायम राहील तर शेअरचा भाव 300 रुपयांच्या वर जायला हरकत नाही. सध्या सुमारे 12 लक्ष शेअर्सचा रोज व्यवहार होतो. गेल्या बारा महिन्यांतील कमाल  व किमान भाव अनुक्रमे 286 रुपये व 157 रुपये होते. या शेअरमध्ये पुढील दोन वर्षे गुंतवणूक जरूर हवी. कार्बन ब्लॅक उत्पादनात कंपनीला फक्‍त गोवा कार्बनची स्पर्धा आहे.

Back to top button