चकाकता हिरा : इन्फो एज | पुढारी

चकाकता हिरा : इन्फो एज

यावेळचा‘चकाकता हिरा’ म्हणून इन्फो एज (INFO EDGE) चा विचार करता येईल. इन्फो एजची डिसेंबर 2018 तिमाहीची विक्री 281 कोटी रुपये होती. डिसेंबर 017 च्या तिमाहीपेक्षा ती 23.7 टक्क्यांनी जास्त होती. तिची नौकरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यवहारात डिसेंबर 017 पेक्षा 20.5 टक्के वाढ होती. नौकरीमधून संगणक कंपन्यांना उमेदवार पुरवले जातात. तिचा दुसरा 99 एकर म्हणून विभाग आहे. त्यातही यावेळेला वाढ आहे. बर्‍यापैकी जाहिराती करून आपल्या व्यवहारांचा प्रसार करते. स्थावर व्यवहारात बर्‍यापैकी मागणी असल्यामुळे तिचे व्यवहार वाढत आहेत. जीवनसाथी हा दुसरा तिचा जो विभाग आहे त्यात  मात्र फारशी वाढ यावेळेला दिसली नाही. नौकरी विभागातील तिचा व्यवहार 70 टक्के असतो. रेरा (RERA)चा कायदा झाल्यानंतर 99 एकर विभागात 30 टक्के वाढ गेल्या नऊ महिन्यात आहे. वधू-वर सूचक मंडळांची संख्या सध्या वाढत असल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत असली तरी या व्यवसायात अनेक संधीही आहेत. 

तयार खाद्यपदार्थ विकत घेण्याची सध्या लाट असल्यामुळे झोमॅटो (ZOMATO) प्रकल्पातून तिला खूप मोठे उत्पन्‍न मिळते. झोमॅटो पिगी बँकतर्फे ती आपल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करीत आहे. अर्थव्यवस्था जशी जशी  प्रगत होत असते तसा तसा मध्यमवर्ग वाढत असतो आणि या वर्गाची सध्या बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्याची चटक वाढली आहे. नौकरी आणि 99  एकर्स या दोन विभागांसाठी तिचा इंटरनेटचा वापर वाढला आहे. गेल्या बारा महिन्यांतील कमाल व किमान भाव अनुक्रमे 1784 व 1722 रुपये अशी होती. इन्फो एजची डिसेंबर तिमाहीची विक्री 272 कोटी रुपये होती. डिसेंबर 2017 तिमाहीसाठी ती 228.3 कोटी रुपये होती. म्हणजे या तिमाहीची विक्री तुलनेने 19 टक्क्याने वाढली आहे. 

Back to top button