FMP (Fixed Maturity Plan) : मुदतबंद ठेवीला आकर्षक पर्याय | पुढारी

FMP (Fixed Maturity Plan) : मुदतबंद ठेवीला आकर्षक पर्याय

रॉबर्ट अरनॉट (Rubert Arnott) हे अमेरिकेतील एक गुंतवणूक तज्ज्ञ, लेखक, संपादक आहेत. त्यांचे एक वचन प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, “”In investing, what is comfortable is rarely profitable.” गुंतवणुकीची काही साधने तुम्हाला सुखाची झोप मिळवून देतील पण ती फायदा मिळवून देतीलच असे नाही. तुम्हाला थोडे अधिक हवे असेल तर तुमच्या Comfort Zone च्या बाहेर तुम्हाला पडलेच पाहिजे. बँकेतील मुदत ठेवी हा तुमचा कम्फर्ट झोन आहे. प्रचलित महागाई दरापेक्षा अधिक उत्पन्‍न तुम्हाला हवे असेल तर मुदत ठेवीच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या. अनेक गुंतवणूक साधने तुम्हाला खुणावू लागतील. FMP (Fixed Maturity Plan)  हे  असेच एक गुंतवणुकीचे साधन आहे, ज्यामध्ये तुम्हाला बँकेतील मुदत ठेवीपेक्षा अधिक परतावा मिळेल आणि शेअर बाजारातील चढउतारांचा धोकाही त्यामध्ये असणार नाही. 

FMP म्हणजे  काय? FMP (Fixed  Maturity Plah) हे नावच आपल्याला अर्थबोध करून देते की FMP हा निश्‍चित मुदतबंद कालावधी असणारा गुंतवणूक प्रकार आहे.  .  FMP म्हणजे क्‍लोज-एंडेड् डेट म्युच्युअल फंड! FMP मधील गुंतवणूक शेअर्समध्ये होत नाही तर ती Certificate of deposits (CDS), Commercial papers (CPS), Money merket instruments,  Corporate bonds आणि काहीवेळा बँकांच्या Fixed deposits मध्ये सुद्धा  होते. FMP   बाजारात आणतानाच तिचा निश्‍चित कालावधी जाहीर केलेला असतो. त्या कालावधीनुसार FMP  मधील गुंतवणूक वर उल्‍लेख केलेल्या विविध साधनांमध्ये केली जाते. अलीकडे बहुतेक FMPs चा कालावधी 3 वर्षे आणि थोडे अधिक दिवस असा असतो. अशावेळी FMP मधील गुंतवणूक ही ज्या साधनांचा मुदत कालावधी 3 वर्षे किंवा त्याहून कमी आहे, अशा साधनांमध्ये केली जाते. याच कारणामुळे FMP ला निश्‍चित Maturity Date असते.

ज्यांना शेअर बाजाराची जोखीम नको आहे आणि एका निश्‍चित कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी FMP हे अतिशय योग्य असे साधन आहे. कारण FMP ला निश्‍चित Maturity Date  असते आणि Indicative returns  ही  सुरुवातीलाच दिलेले असतात. हे रिटर्नस् जरी guaranteed नसले तरी अंतिमतः त्यामध्ये अगदी थोडा बदल होऊ शकतो आणि हे Returns बँकेच्या FD  पेक्षा निश्‍चितच थोडे अधिक असतात. 

FMP  हा क्‍लोज एंडेड फंड असल्यामुळे तो जेव्हा नवीन बाजारात येतो तेव्हाच त्यामध्ये गुंतवणूक करता येते. आणि तो जेव्हा Mature  होतो तेव्हाच त्यातून बाहेर पडता येते. या अर्थाने FMP मध्ये तरलता (Liquidity) कमी असते. सेबीच्या निर्देशानुसार सर्व FMPs चे NSE व BSE  वर Listing  होत असले तरी तिथे FMPs चे व्यवहार फारसे होत नाहीत. त्यामुळे FMP  मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा मुदतबंद कालावधी पहावा आणि तोपर्यंत तुमची थांबायची तयारी असेल तरच त्यामध्ये गुंतवणूक करावी. 

FMP  हा प्रकार कळसह High Networth   असणार्‍या किंवा 30 टक्क्यांच्या आयकर वर्गवारीत येणार्‍या नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याचे कारण म्हणजे त्याला लागू होणारा Indexation Benefit चा नियम! FMP  हा डेट फंड असल्याने त्यापासून तीन वर्षानंतर होणारा लाभ हा दीर्घकालीन भांडवली लाभ (Long term capital gain) समजला जातो.  20 20 percent with indexation   आणि 10 percent without indexation त्याला किंवा च्या नियमाने आयकर लागू होतो. आपल्याला  माहीतच असेल की (Infiation Rate) म्हणजे कर आकारणीच्या कालावधीत महागाईचा दर (Infiation Rate) किती वाढला तो विचारात घेऊन केलेली कर आकारणी! त्यामुळे अंतिमतः कर कमी होतो आणि पर्यायाने आपल्या गुंतवणुकीचे yeild बँकेच्या मुदतठेवीपेक्षा वाढते. या लेखाचे सार म्हणजे ज्या लोकांना बँकेपेक्षा थोडे अधिक उत्पन्‍न हवे आहे. शेअर मार्केटची जोखीम नको आहे. किमान 3 वर्षे थांबायची ज्यांची तयारी आहे आणि सवलतीचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी अगदी अवश्य आपली गुंतवणूक FMP मध्ये करावी. (अ‍ॅम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड अ‍ॅडव्हायझर)

Back to top button