बिर्ला केबल | पुढारी | पुढारी

बिर्ला केबल | पुढारी

यावेळचा चकाकता हिरा म्हणून ‘बिर्ला केबल’चा विचार करता येईल. सध्या या शेअरचा भाव 166 रुपये आहे. वर्षभरात तो 225 रुपये होऊ शकेल. या कंपनीचे पूर्वीचे नाव बिर्ला एरिक्शन ऑप्टिकल असे होते. दूरवहन केबल व्यवयसायात लागणार्‍या तांब्याच्या आणि ऑप्टिकल  फायबरच्या तसेच अनेक प्रकारच्या स्पेशॅलिटी वायर्सचे आणि केबल्सचे तिचे उत्पादन आहे. डक्ट अ‍ॅप्‍लिकेशनसाठी लागणार्‍या बिन चिलखती केबल्सचे तिचे उत्पादन आहे. तिचे भाग भांडवल 30 कोटी रुपये आहे. कर्जे 12 कोटी रुपयांची आहेत. 2017 मार्चसाठी तिची विक्री 230 कोटी रुपये होती. 2018 मार्च वर्षासाठी ती 329 कोटी रुपये झाली.  पुढील दोन वर्षासाठी म्हणजे मार्च 2019 व मार्च 2020 साठी संभाव्य विक्री 553 कोटी रुपये व 690 कोटी रुपये अनुक्रमे होऊ शकते. मार्च 2017 व मार्च 2018 वर्षासाठी तिचा नफा 3.33 कोटी रुपये व 1.61 कोटी रुपये अनुक्रमे होता.

मार्च 2019 व 2020 या दोन वर्षांसाठी संभाव्य नफा 56 कोटी रुपये व 68 कोटी रुपये इतका वाढला असेल. मार्च 2017 व मार्च 2018 चे शेअरगणिक उपार्जन 1.11 व 5.38 रुपये होते. मार्च 2019 व मार्च 2020 साठी ते अनुक्रमे 18.67 रुपये व 22.74 रुपये होईल. तिची 30 जून 2018 तिमाही ते 31 मार्च 2019 पर्यंतची चार तिमाहींची विक्री अनुक्रमे 117.48 कोटी रुपये, 140.3 कोटी रुपये, 144 कोटी ते 171 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2018 व मार्च 2019 ची तिमाहीची विक्री 145 कोटी व 151 कोटी रुपये होईल. तिचे शेअरगणिक उपार्जन 3.69, 5.24 रुपये, 5.06 रुपये व 4.68 असेल. सध्याच्या भावाला किं/ऊ गुणोत्तर 32  पट आहे. मार्च 2019 व मार्च 2020 वर्षासाठी ते अनुक्रमे 9.16 रुपये व 7.52 रुपये होईल. मात्र या शेअरमध्ये रोज कमी व्यवहार होतात. 

गेल्या बारा महिन्यांतील उच्चांकी भाव 230 रुपये होता तर नीचांकी भाव 58 रुपये होता. जुलै 2018 पासून या शेअरचा भाव सतत वर जात आहे. 

 

Back to top button