पुढारी ऑनलाईन डेस्क
शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज, गुरुवारी (दि.२१) पहिल्यांदाच विक्रमी ५० हजारांचा आकडा पार केला. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्सने इतकी मोठी उसळी घेतली. (Sensex crosses 50000 mark in pre opening session) तसेच निफ्टीही वधारला.
वाचा : अमेरिकेतील सत्तांतरानंतर सेन्सेक्सची ५० हजारांवर उसळी
जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असून, ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेतील या सत्तांतरांनतर आशियातील बाजारात तेजीचे वातावरण दिसून येत आहे. जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर वॉल स्ट्रीट शेअर बाजाराने बुधवारी मोठी उसळी घेतली होती. त्यानंतर आज भारतीय शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली.
वाचा : MPSC नियुक्त्यांबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. सध्या अमेरिकेतील शेअर बाजारात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिका महासत्ता असल्याने जगातील मार्केट त्यावर अवलंबून आहे. अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर वॉल स्ट्रीट शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. त्यानंतर गुरुवारी (दि.२१) भारतातील शेअर बाजारातदेखील सकारात्मक वातावरण तयार झाले. त्यामुळे सेन्सेक्स विक्रमी स्तरावर पोहोचला.
वाचा : पुणे : करणी काढण्यासाठी घ्यायला लावली सात लाखांची कबुतरे; मरणाची भिती घालून घातला गंडा!
गेल्या महिन्यात भारतीय शेअर बाजारात १ कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक झाली आहे. त्यात भारतीय अर्थव्यवस्था सुधारत असल्याने गुंतवणूकदारांना फायदा होत आहे. पण गुंतवणूक करताना सावधगिरी महत्वाची असते.
याबाबत माहिती देताना शेअर बाजार विश्लेषक समीर कुलकर्णी सांगतात की, बीएसई सेन्सेक्स १९८० मध्ये सुरु झाला. त्यावेळी सेन्सेक्सेची सुरुवात १०० अंकांनी झाली होती. आता सेन्सेक्स ५० हजारांवर गेला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी रोज नवे उच्चांक गाठत आहेत. शेअर बाजार हा खाली-वर होत असतो. त्यासाठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
वाचा : पुणे : कात्रजचा डोंगर विकणे आहे…
इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक फायद्याची…
इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणे जरुरी आहे. इक्विटी मार्केट सर्वांत जास्त परतावा देणारे माध्यम आहे. पण गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी.
१० वर्षांसाठी गुंतवणूक करा…
आपली गुंतवणूक १० वर्षांसाठी असावी. १० वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास इक्विटी मार्केटमधून जास्त परतावा मिळेल.
सोन्यापेक्षा इक्विटीमध्ये करा गुंतवणूक…
सोने, रिअल इस्टेट आणि बँक मुदत ठेव(एफडी) यापेक्षा इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळू शकेल.
सेन्सेक्स, निफ्टीमध्ये गुंतवणूक…
सध्या शेअर बाजारात गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुंतवणूक करा.