GST : अर्थवार्ता | पुढारी

GST : अर्थवार्ता

* निफ्टीमध्ये एकूण 3.02 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 3.34 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. शुक्रवारच्या सत्रात बँक तसेच वित्तसंस्था संबंधी कंपन्यांच्या समभागामध्ये भरघोस वाढ नोंदवली गेली. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खनिज तेलाच्या किमती पुन्हा 104 डॉलरपर्यंत खाली आल्याने तसेच सरकारकडे जमा होणारा महसूल आजपर्यंत विक्रमी पातळीवर पोहोचल्याच्या बातमीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

* मार्च 2022 महिन्यात जीएसटी (GST) संकलन आजपर्यंतच्या विक्रमी पातळीवर म्हणजेच 1.42 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये एकूण केंद्रीय जीएसटी महसूल 5.90 लाख कोटींवर पोहोचला. जीएसटी (GST) संकलनाच्या सुधारित अंदाजापेक्षा सुमारे 20 हजार कोटींचे अधिकच जीएसटी संकलन यावर्षी झाले.

* भारत रशियाकडून सुमारे 35 डॉलर प्रती बॅरल सवलतीच्या दरामध्ये खनिज तेल खरेदी करणार. बाजारभावापेक्षा सुमारे 30 ते 35 टक्के सवलतीच्या दरात तेल विकण्यास रशिया उत्सुक. खनिज तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्यास अगदी 45 डॉलर प्रती बॅरलपर्यंत सवलत देण्यास तयार असल्याचे रशियाचे अंदाज. सध्या ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या प्रणालीमध्ये डॉलरमार्फत व्यवहार करण्यास रशियावर प्रतिबंध असल्याने हा व्यवहार रुपये-रुबल (रशियाचे चलन) या चलनामार्फत करण्यास रशिया तयार. या व्यवहारावर अमेरिका तसेच ब्रिटनसारख्या राष्ट्रांनी टीका केल्यावर भारताच्या अर्थमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. रशिया भारतापेक्षा युरोपियन राष्ट्रांना खनिज तेलाची जास्त निर्यात करतो. तेलाच्या किमती वाढत असताना सवलतीच्या दरात व्यवहार करणे हा आमचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिटिश परराष्ट्रमंत्री ‘लिझ ट्रस’ यांच्याशी चर्चा करताना म्हटले. अखेर ‘लिझ ट्रस’ यांनी मवाळ धोरण स्वीकारत ‘भारताने काय करावे हे आम्ही सांगणार नसल्याचे’ स्पष्ट केले.

* ‘स्विफ्ट’ या डॉलरचा वरचष्मा असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रणालीतून रशियावर निर्बंध आणल्याने रशियाला माल निर्यात करणार्‍या भारतीय निर्यातदारांचे पैसे अडकले. सध्या 600 दशलक्ष डॉलर्स अडकल्याचा अंदाज. अर्थात, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गाई लाव्होव यांनी रुपये-रुबल स्वरूपात व्यवहार पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु भारताकडून यासंबंधी निर्णय येणे बाकी आहे.

* देशातील महत्त्वाची दुचाकी कंपनी ‘हिरोमोटोकॉर्प’वर आयकर विभागाच्या धाडी. काही बनावट कंपन्यांमार्फत 800 कोटींची रक्कम संशयास्पदरीत्या फेरफार केल्याचा अंदाज. व्यावसायिक खर्च म्हणून दर्शवलेल्या रकमांसाठी योग्य ते सबळ पुरावे पावत्या कंपनीकडे नसल्याचे आयकर विभागाचे म्हणणे. एकूण 35 ठिकाणी आयकर विभागातर्फे धाडी टाकण्यात आल्या.

* फेब्रुवारीअखेर भारताची वित्तीय तूट (फिस्कल डेफिसीट) सुधारित अंदाजाच्या (ठर्शींळीशव एीींळारींश) 82.7 टक्क्यांपर्यंत पोहोचली. फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारने 2.4 लाख कोटींची विविध राज्यांची देणी परतफेड केली. तसेच गत आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत चालू खात्याची तूट (करंट अकाऊंट डेफिसीट) 23 अब्ज डॉलर्स म्हणजेच जीडीपीच्या 2.7 टक्क्यांपर्यंत पोहोचली.

* केकेआर ग्लोबल इक्विटी फंडाशी संलग्न असलेल्या कयक इन्व्हेस्टमेंट ‘मॅक्स हेल्थकेअर’ कंपनीमधील 10 टक्के हिस्सा विकून टाकला. एकूण 96.96 दशलक्ष समभागांची सरासरी 340 रुपये प्रतिसमभाग दरावर विक्री करण्यात आली. सुमारे 3297 कोटींमध्ये हा व्यवहार पार पडला. या व्यवहारापश्चात कयक इन्व्हेस्टमेंटचा ‘मॅक्स हेल्थकेअर’मधील हिस्सा 37.54 टक्क्यांवरून 27.54 टक्क्यांपर्यंत खाली आला.

* ‘बेन कॅपिटल’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार उद्योग समूहाने ‘आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेट’ कंपनीमधील 24.98 टक्के हिस्सा 3680 कोटींना खरेदी केला.

* मल्टिप्लेक्सची साखळी असलेल्या मनोरंजन क्षेत्रातील दोन प्रमुख कंपन्या ‘पीव्हीआर’ आणि ‘आयनॉक्स’ एकत्र (चशीसश) येणार. एकत्रित झालेल्या कंपनीमध्ये आयनॉक्सचा 16.66 टक्के तर पीव्हीआरचा 10.62 टक्के हिस्सा असणार. या एकत्रित झालेल्या कंपनीकडे देशातील 109 शहरांमध्ये 1546 पडदे (स्क्रीन्स) असतील. प्रति 10 आयनॉक्सच्या समभागांबदल्यात पीव्हीआरचे 3 समभाग या गुणोत्तरानुसार (शेअर स्वॉट रेशो) एकत्रीकरण होणार.

* व्होडाफोन-आयडिया कंपनी आपल्या प्रवर्तक उद्योग समूहातील तीन कंपन्यांसाठी 13.30 रुपये प्रतिसमभाग दरावर 3.38 अब्ज समभाग वाटप (रश्रश्रेीं) करणार. युरो पॅसिफिक, प्राईम मेटल्स, ओरियाना इन्व्हेस्टमेंट अशी या कंपन्यांची नावे असून एकूण 4500 कोटींचा निधी याद्वारे उभा केला जाणार. लवकरच व्होडाफोन-आयडियाद्वारे आणखी 10 हजार कोटींचा निधी इक्विटी तसेच रोख्यांच्या माध्यमातून उभा केला जाणार.

* 25 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 2 अब्ज डॉलर्सने घटून 617.65 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button