अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 443.05 आणि 1478.38 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 18255.75 व 61223 अंकांच्या पातळीवर बंद झाले. सप्‍ताहाअखेर निफ्टी व सेन्सेक्स सपाट (षश्ररीं-लश्रेीश) बंद झाले. दोन्ही निर्देशांक पुन्हा एकदा आपल्या सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचले आहेत. निफ्टी सर्वोच्च पातळीपासून केवळ 349 अंक, तर सेन्सेक्स सर्वोच्च पातळीपासून केवळ 1022 अंक दूर आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निफ्टी व सेन्सेक्समध्ये एकूण 2.49 टक्के व 2.47 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा नफा 1.5 टक्के वधारून 9769 कोटींवर पोहोचला. कंपनीने अठरा हजार कोटींचा समभाग पुनर्खरेदीचा (शेअर्स बायबॅक) निर्णय जाहीर केला. 4500 रुपये प्रति समभाग दरावर समभागांची खरेदी केली जाणार. समभाग पुर्नखरेदीमध्ये सर्वात मोठा वाटा हा टाटा समूहाच्या प्रमुख कंपनी टाटा सन्स आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन यांचा असणार आहे. 18 हजार कोटींपैकी तब्बल 12993.2 कोटींचे समभाग (शेअर्स) या दोन प्रमुख कंपन्यांकडून पुनर्खरेदी केले जातील.

टीसीएस प्रमाणेच देशातील महत्त्वाची आयटी कंपनी विप्रोचे देखील तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करण्यास कंपनीची कामगिरी असमर्थ ठरली. कंपनीचा मागील तिमाहीच्या तुलनेत 1.3 टक्के वधारून 2969 कोटी झाला. तसेच कंपनीचा महसूल 3.28 टक्के वधारून 20313 कोटी झाला. पुढील तिमाहीमध्ये कंपनीने आपला महसूल दोन ते चार टक्के दरम्यान वाढण्याची अपेक्षा व्यक्‍त केली आहे.

इन्फोसिसनेदेखील आपले तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केले. तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी बजावली. कंपनीच्या महसुलामध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत 7.7 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 31867 कोटींवर पोहोचला. निव्वळ नफ्यामध्ये देखील तब्बल 7.2 टक्क्यांची वाढ होऊन नफा 5809 कोटींवर पोहोचला.

देशातील किरकोळ महागाई दराने मागील सहा महिन्यांचा उच्चांक गाठला. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.59 टक्क्यांपर्यंत पोहोचला, तसेच औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) मागील नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 1.4 टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच घाऊक महागाई निर्देशांक (ुळि ळपषश्ररींळेप) 14.23 टक्क्यांवरून 13.56 टक्क्यांपर्यंत खाली आला.

व्होडाफोन-आयडियाच्या बोर्डाने एजीआर ड्युज (थकीत कर) च्या बदल्यात आप्लाय कंपनीतला 35.8 टक्के हिस्सा इक्विटी स्वरूपात सरकारला देण्याची तयारी दाखवली. व्होडाफोन- आयडियाकडे 58254 कोटींचे थकीत कर (एजीआर ड्युज) आहेत. त्यापैकी कंपनीने 7854 कोटी करांची परतफेड केली आहे. उरलेल्या रकमेची परतफेड करण्याऐवजी तेवढा हिस्सा सरकारला देण्याची तयारी कंपनीने केली आहे. या निर्णया पश्‍चात कंपनीमध्ये सरकारचा 35.8 टक्के वाटा तसेच व्होडाफोन- आयडिया समूहाचा 28.5 टक्के वाटा आणि आदित्य बिर्ला ग्रुपचा 17.8 टक्के वाटा असेल.

एचसीएल टेक्नॉलॉजीचे निकाल जाहीर. महसूलमध्ये 8.1 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 22331 कोटींवर पोहोचला. नफ्यामध्येदेखील 5.4 टक्क्यांची वाढ होऊन नफा 3442 कोटींवर पोहोचला.

भारताच्या निर्यातीने नवा विक्रम प्रस्थापित केला. डिसेंबर महिन्यामध्ये भारतातून निर्यात होणार्‍या वस्तूमध्ये 39 टक्क्यांची वाढ होऊन निर्यात तब्बल 37.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. निर्यातीप्रमाणेच आयातीमध्येदेखील वाढ झाली. आयातदेखील 39 वाढून 59.5 अब्ज डॉलरवर पोहोचली. परिणामी, देशाची व्यापार तूट 21.7 अब्ज डॉलर्स झाली.

चालू आर्थिक वर्षाअखेर सरकार एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी प्रयत्नशील केंद्र सरकारला सुमारे पंधरा लाख कोटींचे भांडवल बाजारमूल्य अपेक्षित असून, पाच टक्के हिस्सा विक्रीद्वारे सुमारे 75 हजार कोटींचा निधी उभा करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य. एलआयसीचे भांडवल बाजारात पदार्पणातच भांडवल बाजारमूल्य रिलायन्स किंवा टीसीएससारख्या बड्या कंन्यांच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड यांच्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंडमधील इक्विटी या प्रकारात तब्बल 25076 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यातील (11614 कोटी) गुंतवणुकीपेक्षा ही गुंतवणूक सुमारे दुप्पट आहे. एसआयपीच्या मार्गाने विक्रमी अशी 11305.34 कोटींची गुंतवणूक भांडवल बाजारात करण्यात आली. या आकडेवारीवरून सामान्य गुंतवणूकदारांचा भांडवल बाजारात वाढलेला विश्‍वास दिसून येतो.

पुढील दोन वर्षांसाठी आयपीएलचे प्रायोजकत्व (ीिेपीशीीहळि) टाटा समूहाकडे दोन वर्षासाठी प्रायोजक रक्‍कम म्हणून 670 कोटींची बोली लावली. यापूर्वी याचे प्रायोजकत्व विवो या चायनीज कंपनीकडे होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा भडकले. ब्रेंट क्रूड तेलाचा भाव 86 डॉलर प्रती बॅरलच्या पुढे गेला. ब्रेंट क्रूडमध्ये मागील आठवड्यात सुमारे साडेपाच टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

7 जानेवारी रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजळी 878 दशलक्ष डॉलर्सनी घटून 632.736 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

  • प्रीतम मांडके, (मांडके फिनकॉर्प)

Back to top button