संकल्प नववर्षाचा, कोट्यधीश होण्याचा! - पुढारी

संकल्प नववर्षाचा, कोट्यधीश होण्याचा!

अनिल पाटील

संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन चांगला सल्लागाराकडून घ्यावे लागते. जेव्हा एखादे मोठे ध्येय ठरवितो, त्या ध्येयाचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर साततत्याने काम केले तर निश्‍चितच मोठे ध्येय पार पाडू शकतो. त्याचप्रमाणे दरमहाच्या उत्पन्नातून केलेली बचत दीर्घकालात योग्य ठिकाणी गुंतविली तर निश्‍चितच तुमच्या खात्यात एक कोटी रु. उभे होतात.

तुम्ही एक कोटीचे ध्येय प्रथम डोळ्यासमोर ठेवा. त्यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय अन् योजनेचा परतावा पहा. तुम्ही सुरक्षित गुंतवणूक पाहाल तर तिथे परतावा कमी असतो. या ठिकाणी मोठी संपत्ती निर्मितीसाठी जीवनातील मोठा आणि मोठा पैसा मोजावा लागतो. याच्या विरुद्धचे क्षेत्र जोखीमयुक्‍त गुंतवणुकीत परतावा मोठा मिळतो. या ठिकाणी कमी रक्‍कम गुंतवणूक करून आपण मोठी संपत्ती निर्माण करू शकतो. अनेक लोक गुंतवणूक करताना ध्येयविरहित सुरक्षित गुंतवणूक करत असतात. रस्ता चुकतात. चुकलेल्या रस्त्याने गेले तर आयुष्यातील गणिते चुकत जातात. अशा लोकांकडे मोठी संपत्ती कधीच उभी होत नाही. जीवनात मोठी संपत्ती निर्माण करावयाची असेल, तर तुम्ही वेळेत पैसे द्या आणि पैसा वाढविण्यासाठी वेळ द्या. करिअरच्या सुरुवातीला पैशाची आवक चालू झाली की, आर्थिक मोठे ध्येय वयाच्या लवकर ठरवा अन् ते पार पाडण्यासाठी खालील त्रिसूत्री समजावून घेऊन नियोजन करावे.
गुंतवणुकीस आयुष्यात लवकर सुरुवात करा.

पैशाला वृद्धीदर चांगला ठेवण्यासाठी जोखीमयुक्‍त गुंतवणूक करा.

चक्रवाढ व्याजाची ताकद काय असते हे समजावून घ्या.

या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याच गोष्टी गुंतवणूकदारांना न समजल्याने त्यांच्या जीवनात मोठी संपत्ती निर्माण करू शकले नाहीत. आज सुरक्षित गुंतवणुकीची ठिकाणे पोष्ट, आयुर्विमा योजना, बँकांमध्ये मिळणारा परतावा 5 ते 6% इतका मिळतो. काही सहकारी बँका, पतसंस्थांमध्ये 8% पर्यंत व्याजदर मिळतात आणि जोखीमयुक्‍त गुंतवणूक म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडात बॅलन्स फंड, लार्जकॅप, मिडकॅप, मल्टीकॅप, स्मॉलकॅप अशा योजनेत मार्केट अशा योजनेत मार्केटची जोखीम असते. मागील वीस वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंडांनी दीर्घकाळात 12 ते 20% पर्यंत परतावा दिलेला आहे. इथे जितकी जोखीम जास्त घेणार तितका परतावा चांगला मिळणार, हा नियम आहे. सुरक्षित योजनांपेक्षा 8% ते 12% जादा परतावा दिला आहे. इथे आपल्या पैशाची गुंतवणूक झाली पाहिजे. एक कोटी रक्‍कम निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या व्याजदराने वेगवेगळ्या मुदतीत किती रक्‍कम गुंतवणूक करावी? खालील तीन तक्त्यांत मुदतीनुसार माहिती दिली आहे.

नववर्षाच्या निमित्ताने जीवनात वेगवेगळे क्षेत्रातील ध्येय अनेकजण ठेवतात. यावर्षी तुम्ही कोट्यधीश होण्याचे ध्येय ठेवा. त्या ध्येयावर लक्ष ठेवून भांडवली बाजारात सातत्याने छोटी छोटी गुंतवणूक सुरू करा. एक दिवस तुमच्या खात्यात एक कोटी रक्‍कम निश्‍चित जमा होईल, यात शंकाच नाही.

आज सर्वसामान्य व्यक्‍ती पैशासाठी काम करतो आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या भावनेखाली आपल्या पैशाला बँकेत झोपवतो. जिथे पैसा वाढण्याऐवजी वाढती महागाई पैसा खाऊन टाकते. त्यांचे मूल्य कमी कमी होत असते. परिणामी, भविष्यातील अर्थगणित चुकते. आज आपल्या देशात प्रचंड बदल होत आहेत. आपला देश मोठे मार्केट आहे. जगातील वेगवान प्रगती करणारा देश आहे. अशा देशात आपला पैसा भांडवली बाजारात गुंतवून पैशाला कामाला लावले पाहिजे. भविष्यात कमी रकमेमध्ये मोठी संपत्ती निर्माण करण्याचे ज्ञान अवगत केले पाहिजे. काळ बदलतोय. स्वतःमध्ये बदल कराल, तरच तुम्ही श्रीमंतीकडे जाऊ शकाल.

(लेखक एस.पी.वेल्थ, कोल्हापूरचे प्रवर्तक आहेत.)

Back to top button