डास का आकृष्ट होतात? | पुढारी

Published on
Updated on

दिगंबर गाडगीळ

एक दिवस मी एका कॉलनीतून संध्याकाळी चाललो होतो. एक परिचित गृहस्थ त्यांच्या घरासमोरच्या बागेत झोपाळ्यावर उघड्या अंगाने बसले होते. ही वेळ होती डासांच्या हल्ल्याची. तरीही नेमक्या त्या वेळी ते उघड्या अंगाने बसलेले पाहून त्यांना हटकल्याशिवाय राहावलं नाही.

"देशपांडे, यावेळी तुम्ही उघड्यावर कसे बसलात? ही वेळ आहे डासांच्या हल्ल्याची!"

"हो, पण मला डास चावत नाहीत."

आश्चर्य आहे. डासांच्या चाव्यानं हैराण झालेले, अंगावर गांधी उठलेली किती माणसं मी पाहिली आहे. आणि यांना डास चावतच नाहीत. का बरं असं असावं?

त्याचं कारण आहे आपल्या भोवतीचं हवेतलं रासायनिक आवरण. त्याचा नेमका उपयोग करून डास आपली शिकार शोधतात.

डास कार्बनडाय ऑक्साईडच्या गंधाच्या शोधात असतात. आपल्या उच्छ्वासातून कार्बनडाय ऑक्साईड टाकत असतो. तो लगोलग हवेत विरून जात नाही. तो काही काळ आपल्या नाकासमोर घुटमळत असतो. नाकाची आणि डोळ्याची पातळी एकत्र असल्याने ते डास आपल्या कानाशी अधिक गुणगुणतात. त्यांना कळतं की इथे आपल्याला शिकार मिळणार, असं जूप व्हॅन लूप म्हणतात. ते नेदरलँडस्मधील बॅनिंजन विद्यापीठात कीटकशास्त्रज्ञ आहेत. डासांना कार्बनडाय ऑक्साईडचा वास 50 मीटरवरूनही समजतो. ते त्या दिशेने मोर्चा वळवतात. साधारणतः एक मीटर अंतरावरून त्यांच्या लक्षात येतं की, आपली शिकार कुठे आहे. इतक्या जवळ आल्यावर त्या माणसाच्या त्वचेचं तापमान त्यातील बाष्प आणि रंगसापेक्ष असतात. त्याची छाननी डास करतात. खरं तर, डासांची मादी रक्त शोषणाचं काम करते. कारण, त्याशिवाय तिला अंडी घालता येत नाहीत. तिला माणसाचं वा जनावराचं रक्त चालतं.

डासांच्या सुमारे 3000 प्रजाती आहेत. त्यातील केवळ एका प्रजातीचा नर स्वतः रक्त पितो. इतर तर केवळ झाडपाल्याचं शोषण करतात. आपल्या त्वचेवर असंख्य सूक्ष्म जंतू राहत असतात. ते घामावर प्रक्रिया करून रासायनिक द्रव्य तयार करतात. त्या द्रव्यांचा गंध डास मादीला आकृष्ट करतो. ही रासायनिक द्रव्ये तीनशेच्या आसपास असतात. त्याचं मिश्रण व्यक्तीसापेक्ष असतं. ज्याची भुरळ पडते तिकडे ती आकृष्ट होते. ज्या माणसाच्या शरीरावर अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात.

त्याच्याकडे तुलनात्मकरीत्या कमी डास आकर्षित होतात, असे झश्रेीेपश या पत्रिकेत म्हटले आहे. जिथे कमी प्रकारचे जंतू असतात, त्या त्वचेवर झश्रेीींळर्लीर, षश्रषळर, अलींळपेलरलीींळर 43 आणि डींरहिूश्रेलेलर्लीी  हे  जंतू असतात. ज्या त्वचेवर विविध प्रकारचे जंतू असतात तिथे र्झीीरेोपरी  आणि तरीर्ळेीेींरु  हे  असतात. एखाद्या त्वचेवर सूक्ष्म जंतूंचे प्रमाण नेहमी कायम असते असे नाही. ते बदलत असते. अर्थात, आपल्या त्वचेवरील सूक्ष्म जंतूवर आपले नियंत्रण नसते.  रफेल यांच्या म्हणण्याप्रमाणे डासांना काळा रंग आवडतो. तेव्हा शक्यतो हलक्या रंगाचे कपडे वापरा. काही व्यक्तींच्या अंगाची उष्णता, त्वचेवरील बाष्प आणि तो सोडत असलेला कार्बनडाय ऑक्साईड यांना अधिक महत्त्व असते. डासांची गुणगुण ही सावज सापडल्याच्या आनंदापोटी नसते तर ती ज्या वेगाने पंख फडफडवीत असते त्याचा असतो तो!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news