आफ्रिकेसह काही देशांमध्ये मंकीपॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला ‘जागतिक स्वास्थ्य आणीबाणी’ घोषित केली आहे. सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश क्षेत्रीय आरोग्य उपसंचालक, आरोग्य अधिकारी, महापालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहेत.
मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्रोत आहेत. अंगावर पुरळ उठण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो. मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे की, थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणार्या मोठ्या थेंबावाटे संसर्ग होऊ शकतो. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील संसर्ग होऊ शकतो.
मागील 3 आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करून राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे
सुजलेल्या लसिका ग्रंथी
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा
घसा खवखवणे आणि खोकला
संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच
विलग करणे.
रुग्णांच्या कपड्यांशी अथवा
अंथरूण-पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे.
हातांची स्वच्छता ठेवणे.
आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स
रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणार्या सूचनांचे पालन करणे.