फायब्रोमायल्जिया : एक वेदनादायी आजार | पुढारी

फायब्रोमायल्जिया : एक वेदनादायी आजार

फायब्रोमायल्जिया या आजारात स्नायूंचे दुखणे बळावते. शरीरातील पेन थ्रेशोल्ड कमी होतो आणि या कारणामुळेही त्यास सेंट्रल पेन एंज्लिफिकेशन डिसऑर्डर देखील म्हटले जाते. या कारणामुळे अंगदुखी ही अधिक तीव्र होत जाते. मेंदूत पेन रिसेप्टर्स असतात आणि ते नर्व्हसमधील न्यूरोट्रान्समीटरच्या स्टीम्यूलेटपासून सक्रिय होतात. या कारणामुळेही शरीरात दुखणे वाढते. अनेकदा रुग्णाला एवढा त्रास होतो की, दुखणे नेमके कोठे आहे, हे देखील लवकर सांगता येत नाही.

प्रमुख लक्षणे :

* शरीराच्या स्नायूंत खूप अधिक दुखणे.
* हात आणि पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे.
* अशक्तपणा आणि थकवा जाणवणे.
* खूप अधिक सेन्सिटिव्ह होणे; म्हणजेच कोणी हलका धक्का दिला तरी त्रास होणे.
* कोणत्याही गोष्टीवरून विचार करत राहणे. त्यामुळे रात्री चांगली झोप न येणे.
* डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास
* चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे
* एकाग्रता नसणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे.
* अपचन, हीट, कोल्ड, लाईट आणि आवाजावरून अधिक संवेदनशील राहणे.
* चिंताग्रस्त किंवा नैराश्य येणे.

आजाराची कारणे :

कौटुंबिक पार्श्वभूमी, अपुरी झोप, अ‍ॅसिडिटी किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजेच पचनशक्ती बिघडणे, महिलांतील हार्मोनल असंतुलन, फूड डिसऑर्डर, इलेक्ट्रोलाईट असंतुलन, मूड बिघडणे, आर्थरायटिस, ऑटो इम्यून क्रॉनिक डिसिज किंवा व्हायरल इन्फेक्शन, शारीरिक हालचाली मंदावणे, शारीरिक, मानसिक, भावनात्मक स्ट्रेस वाढणे. या कारणांमुळे सतत विचार करणे, अपघात किंवा फिजटल ट्रामानंतर स्ट्रेस वाढणे.

निदान :

‘फायब्रोमायल्जिया’ चे निदान करण्यासाठी डॉक्टर लक्षणाच्या आधारावर काही चाचण्या करण्यास सांगतात. अनुवंशिकता किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीचे आकलन केल्यानंतर रुग्णाची होल बॉडी चेकअप केली जाते. रक्ताच्या चाचण्या, यूरिक अ‍ॅसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन-डीची पातळी तपासली जाते.

यासाठी अमेरिकी कॉलेज ऑफ रूमेटोलॉजीने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शरीरातील 18 टेंडर पॉईंटची माहिती दिली आहे. यात 11 पॉईंट्सपेक्षा अधिक भागात त्रास होत असेल तर त्यास ‘फायब्रोमायल्जिया’ असे म्हणता येईल.

उपचार :

फायब्रोमायल्जियावरील उपचार सिंप्टोमॅटिक आणि मल्टिफोकलने केले जातात. यासाठी त्याच्या आजाराचे मूळ शोधण्यात येते. रुग्णाच्या तब्येतीनुसार सिंप्टोमॅटिक मेडिसिन देण्यात येते आणि त्रास कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे, स्नायूचे दुखणे कमी करण्यासाठीची औषधे, अँटी डिप्रेसेंट, मूड चेंजर औषधे दिली जातात.

आजार बरा होण्यासाठी उपचारांबरोबरच चांगली जीवनशैली देखील अंगीकारणे गरजेचे आहे.

शरीरात दुखणार्‍या टेंडर पॉईंटवर कायरोप्रेक्टर, अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्युपंक्चर थेरपीदेखील करता येईल. ट्रिगर पॉईंटवर नोडसचे वेदनाशामक मसाज किंवा स्ट्रेचिंग, बॉल मसाज, फोम रोलर केल्यानंतरही आराम मिळतो.

रिलॅक्सेशन थेरपीत दुखण्याच्या ठिकाणी हिटिंग पॅड किंवा आइस पॅक लावल्यामुळे आराम मिळतो.

रुग्णाला नियमितरूपाने एरोबिक एक्सरसाईज, मेडिटेशन, योग, ब्रीदिंग एक्सरसाईज, वॉकिंग केल्याने फायदा मिळतो. यामुळे शरीरातील मॅकेनिझम व्यवस्थित राहते. स्ट्रेस कमी राहतो आणि रुग्णाला आराम मिळतो. गरज भासल्यास फिजिओथेरपीचा आधारदेखील घेतला जातो.

स्ट्रेसफुल अ‍ॅक्टिव्हिटीजवरील नियंत्रणासाठी ऑक्युपेशनल थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी, कौन्सिलिंगची मदत घेतली जाते. सहकार्‍यांशी, कुटुंबाची चर्चा केल्यास ताण कमी होतो.

दररोज सात ते आठ तास चांगली झोप घेणे गरजेचे आहे.

‘फायब्रोमायल्जिया’च्या आजारात चांगली झोप फायदेशीर ठरते.

समतोल आहार गरजेचा आहे. घरात तयार केलेले पोषक तत्त्वयुक्त जेवण करायला हवे. तेलकट, तूपकट, मसालेदार, प्रोसेस्ड फूड टाळायला हवेत. कॅफिनचे सेवन कमी करणे आवश्यक आहे.

सकारात्मक विचार ठेवा.

नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. गरज भासल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यांशी, मित्राशी आणि नातेवाईकांशी बोलत राहा. या आधारावर ताण कमी राहील.

डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button