लॅपटॉप वर काम, अनारोग्यास निमंत्रण | पुढारी

लॅपटॉप वर काम, अनारोग्यास निमंत्रण

कोरोना महामारीमुळे अनेक कंपन्यांमधील कर्मचारी, अधिकारी आपापल्या घरून लॅपटॉप च्या साहाय्याने काम करत आहेत. परंतु, लॅपटॉपच्या नियमित वापराने हातदुखी, मानदुखी, पाठदुखी याबरोबरच कॅन्सर, नपुंसकत्व यासारख्या समस्या भेडसावू शकतात.

* लॅपटॉपवर काम करताना हाताला पुरेशी विश्रांती मिळत नाही. लॅपटॉपवर सतत टाईप केल्याने बोटांमध्ये रेपीटेटीव्ह स्ट्रेन इंज्युरी (आरएसआय) होते. याला कॉरपल टनल सिंड्रोम असेही म्हणतात. यात बोटांमध्ये वेदना होणे, थरथरणे, किंवा बोटे सुन्न होणे, बोटांमध्ये कमजोरी येणे, एखादी वस्तू पकडताना त्रास होणे, मोटर स्किल, लिहिताना त्रास होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

* लॅपटॉपवर काम करताना चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मान, पाठीचा कणा आणि कंबरेमध्ये वेदना होण्याची समस्या निर्माण होते. सर्व्हायकल स्पाँडिलिसिस पण होऊ शकतो.

* जे लोक बराच काळ लॅपटॉप आपल्या मांडीवर ठेवून काम करतात त्यांच्यामध्ये प्रजननासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. लॅपटॉप चालू असताना त्यातून निघणारी उष्णता आणि चुंबकीय किरणांमुळे स्त्री-पुरुषांमध्ये वंध्यत्व निर्माण होऊ शकते. लॅपटॉपपासून निघणार्‍या इलेक्ट्रॉनिक वेव्हज या पुरुष आणि स्त्रियांच्या नाजूक अंगावर प्रभाव टाकतात. त्यामुळे जननांगाची कार्यक्षमता प्रभावित होते.

* लॅपटॉप डोळ्यांसाठी मात्र खूपच धोकादायक ठरू शकतो. लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्याने डोळ्यांचा कोन कमी होत जातो. याचा डोळ्यांवर प्रतिकूल परिणाम होतो.

* न्यूयॉर्क विश्वविद्यालयातील केलेल्या संशोधनानुसार जे लोक लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करतात, त्यांच्या अंडकोशाचे तापमान 2.6 ते 2.8 डीग्रीने वाढते. त्यामुळे यामध्ये स्पर्म बनविण्याची संख्या कमी होते. महिलांंनीही लॅपटॉप मांडीवर ठेवून वापरला तर वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

* लॅपटॉपभोवती कमी दाबाचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. याचा बायॉलॉजिकल प्रभाव दिसून येतो. तो म्हणजे पेशींचा होणारा विकास यामुळे प्रभावित होतो, यामुळे स्वप्नदोष, कॅन्सर, पेशींची वाढ झालेली दिसून येते.

* एवढेच नाही तर यामुळे न्यूरॉलॉजिकल फंक्शनमध्येही बदल होतात. कमी दाबाच्या चुंबकीय क्षेत्रामधील किरणांमुळे लिंफोसाईट (लढाऊ पेशी) च्या क्षमतेवर परिणाम करतात, ज्यामुळे कॅन्सरसारखी समस्या निर्माण होते.

विश्वास सरदेशमुख

Back to top button