पनीर सेवनाचे काही विशेष फायदे माहीत आहे का? | पुढारी

पनीर सेवनाचे काही विशेष फायदे माहीत आहे का?

शाकाहारी लोकांना काही चटपटीत खावेसे वाटले की त्यांची पसंती असते ती पनीरला. पनीरचे विविध पदार्थ चविष्ट आणि रूचकर केले जातात. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी पनीरचे पदार्थ हे विशेष पदार्थ असतात. हल्ली घरीदेखील पनीरचे विविध पदार्थ पाहुण्यांच्या सरबराईसाठी तयार केले जातात. पनीर घरीदेखील तयार केले जाते. पनीर रूचकर लागतेच, पण हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी ते आवश्यक आहे. पनीरचे सेवन केल्याचे काही विशेष फायदे होतात. पाहूया…

दात आणि हाडे : पनीरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हाडे आणि दात मजबूत होतात. त्याचबरोबर कॅल्शिअम, फॉस्फरसचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. नियमित पनीरचे सेवन केल्यास हाडांच्या समस्या, सांधेदुखी आणि दंतरोग यांच्यापासून बचाव होतो.

मेटाबोलिझम अर्थात चयापचय : पचन आणि पचनसंस्था यांच्यासाठी मेटाबोलिझमची भूमिका महत्त्वाची असते. पनीरमध्ये पचनयोग्य तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे भोजन पचणे सोपे जाते. पचनसंस्थेचे कार्य सुयोग्य पद्धतीने चालण्यासाठी ते फायदेशीर आणि महत्त्वपूर्ण असते.

कर्करोग : पनीरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्करोगाला प्रतिबंध. नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये हे स्पष्ट झाले आहे की पनीरमध्ये कर्करोगाची कारणे आणि कर्करोगाचा धोका कमी करण्याची क्षमता असते. पोटाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांच्या उपचारामध्ये पनीरचे सेवन खूप प्रभावी असते.

मधुमेह : पनीरमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. त्यामुळे पनीर मधुमेहाशी अगदी प्रभावीपणे दोन हात करते. मधुमेही रुग्णांनी रोज आपल्या आहारात पनीरचे सेवन करावे, असा सल्ला डॉक्टर देतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी प्रभावी ठरते.

त्वरित ऊर्जा : दुधापासून बनवलेले असल्याने पनीरमध्येही दुधाचे गुण येतातच. ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी पनीरचे सेवन करणे फायदेशीर असते. शरीरयष्टी संपादन करण्यासाठी व्यायाम करणार्‍यांनी पनीरचे सेवन केल्यास त्याचे विशेष फायदे होतात.

विजयालक्ष्मी साळवी

Back to top button