गळ्याचा कर्करोग, लक्षणे काय असतात? | पुढारी

गळ्याचा कर्करोग, लक्षणे काय असतात?

गळ्याचा कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने पुरुषांचा समावेश असतो. हा कर्करोग तीन प्रकारचा असतो. सुप्राग्लोटीस, ग्लोटीस आणि सबग्लोटीस. आपल्या देशात सुप्राग्लोटीस कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. तंबाखू सेवन, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे घशाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. वयाच्या चाळीशीनंतर अशा प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते. आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत घटकांमध्ये या व्याधीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते. घशाच्या कर्करोगाची लक्षणे खालीलप्रमाणे सांगितली जातात.

1) असा कर्करोग झालेल्या रुग्णांचा आवाज घोगरा होतो. तुमचा आवाज अनेक दिवसांकरिता घोगरा राहिला आणि तो पूर्ववत होत नाही, असे दिसले तर त्या व्यक्तीला घशाचा कर्करोग झाल्याची शक्यता असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा आजार वाढल्यानंतर श्वास घेण्याससुद्धा त्रास होऊ लागतो. रुग्णाला अन्न गिळण्यासही त्रास होतो. अनेक जणांचे वजन कमालीचे कमी होऊ लागते.

2) द्रव पदार्थ पिण्यास अडचणी येऊ लागतात. कफामुळे द्रव पदार्थ गिळता येण्यास अडचणी येतात.

3) शरीरात अन्न जात नसल्याने कमालीचा अशक्तपणा येतो. झाल्यास प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होऊ लागते. शरीरातील ताकद संपुष्टात येऊ लागल्याने त्याचे अनेक परिणाम दिसून येतात.

4) काही रुग्णांना कानदुखीची समस्या जाणवू लागते. तसेच काही जणांची मान सुजते.

घशात हा कर्करोग किती पसरला आहे, हे या तपासणीतून कळू शकते. रुग्णाच्या मानेचीही तपासणी करण्यात येते. सुरुवातीच्या तपासणीनंतर घशाचे सिटीस्कॅनिंग करून घेण्यास सांगितले जाते. सिटीस्कॅन केल्यानंतरच त्या व्यक्तीला कर्करोग झाला आहे की नाही, याचे निदान केले जाते. कर्करोग झाला असल्यास तो किती पसरला आहे, हे सिटीस्कॅनद्वारे कळू शकते.

कर्करोगाने थायरॉईड कार्टिलेजवर परणिाम झाला आहे की नाही, हेही अशा तपासणीतून दिसते. अन्ननलिकेवर काही परिणाम झाला आहे का, हेही या तपासणीतून कळू शकते. ज्या भागात कर्करोग झाला असेल, तो भाग तपासणीत आढळून आल्यावर त्यावर कोणत्या पद्धतीने उपचार करायचा याचा निर्णय घेतला जातो.

याचबरोबर छातीचा एक्स-रे काढला जातो आणि सिटीस्कॅनही केले जाते. कर्करोग फुप्फुसापर्यंत गेला आहे की नाही, हे या तपासणीतून कळू शकते. या तपासण्या झाल्यानंतर रुग्णाला भूल देऊन बेशूद्ध केले जाते आणि लेरिंगोस्कोपीद्वारे शरीरात कर्करोग किती पसरला आहे, हे जाणून घेतले जाते. त्यानंतर बायोप्सी केली जाते.

बायोप्सीनंतरच त्या व्यक्तीला कर्करोग झाला आहे की नाही, हे ठरवले जाते.रुग्णाच्या शरीरात कर्करोगाने चांगलेच हातपाय पसरले असतील, तर त्या रुग्णाला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागतो. हा त्रास टोकाला पोहोचला, तर त्या रुग्णावर ट्रेकिओस्टॉमी केली जाते. या उपचारात एक ट्यूब गळ्यातून श्वासनलिकेत सोडली जाते. त्यामुळे श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा मार्ग मोकळा होतो. श्वास घेणे सोपे होते. काही वेळा लेरिंगोस्कोपी तपासणी वेळीच ट्रेकिओस्टॉमी केली जाते.

कर्करोगाचे स्वरूप पाहूनच कोणत्या प्रकारचे उपचार करायचे, याचा निर्णय डॉक्टर घेतात. कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे, यावर उपचाराच स्वरूप ठरते. कर्करोग पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात असेल, तर शस्त्रक्रिया अथवा रेडिओथेरपी केली जाते. व्याधी तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात पोहोचली असेल, तर किमो-रेडिएशन उपचार केले जातात. शस्त्रक्रिया केल्यांनतर पुन्हा रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी करण्याची गरज भासू शकते. व्याधी पहिल्या अथवा दुसर्‍या टप्प्यात असेल, तर मायक्रो लोरिंगोस्कोपी शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया मायक्रोस्कोपच्या मदतीने केली जाते. ट्युमर हटवण्यासाठी लेझरचा वापर केला जातो.

या उपचारात काही डॉक्टर सर्जीकल रोबोचा वापर करतात. त्याचबरोबर रेडिओथेरपीच्या माध्यमातूनही या कर्करोगावर उपचार केले जात आहेत. तिसर्‍या अणि चौथ्या टप्प्यात ट्युमरवरील उपचार त्याच्या आकारावर अवलंबून असतात. काही वेळेस ट्युमरवर टोटल लेरिंग्जेक्टॉमी नावाची शस्त्रक्रिया करण्यात येते. या शस्त्रक्रियेद्वारे लेरिंक्सचे कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात.

टोटल लेरिंग्जेक्टॉमी शस्त्रक्रियेमध्ये गळ्यातील लिम्फ ग्रंथी बाजूला काढल्या जातात. या शस्त्रक्रियेमुळे श्वास घेणे कसे सोपे होईल, याकडे लक्ष दिले जाते. शस्त्रक्रियेदरम्यान लेरिंग्ज काढून टाकल्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर बोलता येत नाही. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला स्पिचथेरपीची गरज भासते. रुग्णाला पूर्ववत बोलता यावे, याकरिता इलेक्ट्रोलेरिंक्स हा एक पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

इलेक्ट्रोलेरिंक्स हे बॅटरीवर चालणारे उपकरण आहे. त्यातून रुग्ण रोबोप्रमाणे बोलू शकतो. टोटल लेरिंजेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला वास घेता येत नाही. कारण, त्याला गळ्यानेच श्वास घ्यावा लागत असतो. लेरिंग्ज नसल्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर अनेक पथ्ये सांभाळावी लागतात. शस्त्रक्रियेनंतर शरीरातील जो भाग काढला जातो, तो भाग हिस्टोपॅथॉलॉजीकल तपासणीसाठी पाठविला जातो.

या तपासणीनंतरच त्या रुग्णावर पुढे कोणते उपचार करायचे, (किमोथेरपी की रेडिओथेरपी) याचा निर्णय डॉक्टर घेतात. उपचार पूर्ण झाल्यानंतरही त्या रुग्णाला नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे जावेच लागते. त्या रुग्णाच्या शरीरात कर्करोगाचे अवशेष शिल्लक राहिले नाहीत ना, याची तपासणी केली जाते. त्याकरिता रुग्णाने उपचार, शस्त्रक्रियेनतर डॉक्टरांकडून आपल्या आरोग्याची वारंवार तपासणी करून घेतली पाहिजे. अशा तपासणीमध्येच कर्करोगग्रस्त भाग आजून शिल्लक आहे का, हे कळू शकते. अनेकजण उपचार किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपण खडखडीत बरे झालो, अशा समजात वावरत असतात;

आपला आवाज कसा असेल, हे स्वरयंत्रावर म्हणजेच लेरिंक्सवर अवलंबून असते. घशातील लेरिंक्स हा अवयव कर्करोगग्रस्त पेशींनी वेढला गेल्यास घशाचा कॅन्सर होतो. देशात कर्करोगांच्या रुग्णांपैकी जवळपास पाच टक्के लोकांना घशाचा कर्करोग झाल्याचे दिसून येते.

Back to top button