मणक्याची शस्त्रक्रिया करताना... | पुढारी

मणक्याची शस्त्रक्रिया करताना...

डॉ. शार्दुल सोमण

मणक्याची शस्त्रक्रिया बद्दल तुम्हाला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला असेल तर उशीर किंवा टाळाटाळ करू नका. शस्त्रक्रिया कधी, कोणावर व कुठल्या पद्धतीने करावी, हे ठरवणे एक शास्त्र आहे. हे शास्त्र प्रगत व उपयुक्त आहे. गरज नसताना शस्त्रक्रिया करणे व गरज असताना ती टाळणे या दोन्ही गोष्टी रूग्णासाठी धोकादायक ठरतात.

आजकाल, बर्‍याच लोकांना मणक्याच्या आजारासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. तथापि, बहुतेक रुग्णांना अजूनही भीती वाटते की, मणक्याच्या शस्त्रक्रिया कधीही यशस्वी होत नाहीत आणि नेहमी टाळल्या पाहिजेत. मणक्याशी संबंधित समस्या असलेल्या सर्व रुग्णांपैकी केवळ 25% रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. इतरांना नॉन-सर्जिकल पद्धतींनी उपचार केले जाऊ शकतात. मात्र अशा रुग्णांनी जर वेळीच उपचार व त्यासंबंधी काळजी घेतली तर नक्कीच उपचार करणे शक्य होते.

मणक्याची शस्त्रक्रिया का आवश्यक?

सामान्यत: डीजनरेटिव्ह किंवा वयासंबंधित संधिवात इतर कारणे दिसून येतात; ज्यामुळे पाठीचा कणा अरुंद होतो. मुंग्या येणे, हात किंवा पायात सुन्नपणा, कमकुवतपणा, चालताना अस्थिरता, तीव्र मानदुखी, पाठदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात. ही कारणे आहेत. मात्र जीवनशैली, प्रतिकारशक्ती, इतर रोग, शारीरिक क्षमता, वजन, धूम्रपान, काही अनुवांशिक कारणे यास कारणीभूत ठरत आहेत. मात्र काही रुग्णांमध्ये अजूनही ही लक्षणे दिसत नाहीत.

सुरक्षितता

लेझर स्पाइन, एंडोस्कोपी, मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी यासारख्या आधुनिक तंत्रांसह योग्य काळजी आणि कौशल्याने, मणक्याची शस्त्रक्रिया हा एक सुरक्षित पर्याय असू शकतो.

मणक्याची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी…

रुग्णांना पूर्वकल्पना देणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक रुग्ण म्हणून या शस्त्रक्रियेच्या संबंधित अपेक्षा, गुंतागुंत, पुनर्प्राप्‍ती याबद्दल विचारले पाहिजे आणि शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांशी तपशीलवार चर्चा केली पाहिजे. यशस्वी मणक्याच्या प्रक्रियेसाठी रुग्ण आणि डॉक्टर यांच्याशी शस्त्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करणे हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे.

Back to top button