Sleeping Problem : जास्त झोपेमुळे आळस निर्माण होतो; पण कमी झोप झाली तर चिडचिड आणि निरुत्साहीपणा निर्माण होतो. शहरी जीवनशैलीमध्ये पावलोपावली स्पर्धा निर्माण होत आहे. यामुळे दगदग, रात्रीची जागरणे, उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करणे अथवा परीक्षेत पहिला येण्याचा ध्यास लागल्यामुळे जागरण. यामुळे पूर्ण आणि शांत झोप होत नाही. नंतर नंतर तर झोप न येण्याचे व्यसनच लागते. मग त्यासाठी औषधे आणि बरेच काही प्रकार केले जातात.
काही वेळा संधी मिळेल तेव्हा अवेळी झोप घेतली जाते. अशावेळी रुटिन बिघडते. त्यामुळे ही झोप अनेक रोगांना आमंत्रण देणारी ठरते. काही लोक झोपण्यापूर्वी चहा, कॉफी यासारख्या एनर्जी ड्रिंकचे सेवन करतात; परंतु याऐवजी गरम दूध घ्यावे. दुपारनंतर एनर्जी ड्रिंकचे सेवन करू नये. तसेच सायंकाळी 4 वाजल्यानंतर एक कपापेक्षा जास्त चहा पिऊ नये. (Sleeping Problem)
काहीवेळा जेवणामध्ये सुस्ती आणणारे काही पदार्थ असतात. मग लगेच झोप येते; परंतु ही झोप घेणे म्हणजे कोलेस्टेरॉलला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे जेवल्या जेवल्या लगेच झोपू नये. थोडी शतपावली करावी. किमान 2 ते 3 तासानंतरच झोपावे. ही झोप आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. चांगल्या झोपेसाठी रात्रीचे जेवण हलके घ्यावे. गच्च पोटभरेपर्यंत आहार घेतल्यानेही झोप उडून जाते. रात्रीच्या जेवणात शक्यतो सूप, सॅलडचे प्रमाण जास्त ठेवावे.
दिवसभराच्या शारीरिक कष्टामुळे किंवा प्रवासामुळे आणि मानसिक ताणतणावामुळे शरीर खूप दमले असते. मग रात्री गरम पाण्याने अंघोळ केली तर खूप बरे वाटेल. शांत झोप येईल म्हणून झोपण्यापूर्वी अंघोळ करतात; पण ही झोप न येण्याची लक्षणे आहेत. झोपण्यापूर्वी कधीही अंघोळ करू नये. झोपण्यापूर्वी योगा करणे किंवा लाइट एक्झरसाईज करणे फायदेशीर ठरू शकते. मानसिक शांतीसाठी तुम्ही थोडा वेळ मेडिटेशनही करू शकता. चांगल्या झोपेसाठी बेडरूममध्ये मंद पिवळा प्रकाश असणे चांगले. झोपताना टीव्ही पाहणे किंवा मोबाईल, मेल पाहणे टाळावे. काही लोक बेडवर पडल्यावर दिवसभरातील गोष्टींचा विचार करतात. असे केल्यास तुम्ही पुन्हा तणावाखाली याल. मग झोप येणारच नाही. त्यामुळे शांत झोप घ्या. कोणताही विचार मनात न आणता घेतलेली झोप ही दुसरा दिवस उत्साहवर्धक देणारी ठरेल. (Sleeping Problem)
हे ही वाचा :