म्यास्थिनिया : एक धोकादायक आजार - पुढारी

म्यास्थिनिया : एक धोकादायक आजार

डॉ. अतुल कोकाटे

म्यास्थिनिया हा एक धोकादायक विकार आहे जो हळूहळू आपले पाय पसरतो. सुरुवातीला या रोगाची लक्षणे अगदी सर्वसाधारण असतात. जसे पायर्‍या चढताना थकवा जाणवणे, चालताना दम लागणे, डोळ्यांची सूज इत्यादी. अनेकदा लहान-मोठ्या शारीरिक मेहनतीच्या कामानंतर आपल्याला खूप थकल्यासारखे वाटते.

म्यास्थिनिया विकाराचा प्रभाव चेहरा आणि मान यांच्यावर जास्त दिसून येतो. बहुतांश वेळा हा रोग अनुवांशिक आहे; पण अनेकदा एखाद्या संसर्गामुळे किंवा दीर्घकाळ शारीरिक मेहनत केल्यामुळेही हा आजारा जडतो.

म्यास्थिनिया का होतो? :

रक्तात अ‍ॅसिटाईलकोलिन रेसेप्टर नावाच्या रासायनिक घटकाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. हा रासायनिक घटक शरीराच्या स्नायूंना अ‍ॅक्टिव्ह आणि ऊर्जेने परिपूर्ण राखतो. या घटकाच्या कमतरतेमुळे स्नायू सुस्त आणि ढीले पडतात. त्यामुळे थोडे जरी चालले किंवा लहान सहान कामे केली तरीही खूप जास्त थकवा येते.

म्यास्थिनियाचा धोका :

हा आजार प्राणघातकही ठरू शकतो. सुरुवातीलाच याची लक्षणे ओळखली नाहीत आणि योग्यवेळी यावर उपचार झाले नाहीत तर जेवण्यास आणि श्वसनासही त्रास होतो, त्यामुळे काही वेळा रुग्णाच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे म्यास्थिनिया रोगाच्या सुरुवातीच्या काळातच उपचारांची शक्यता पडताळावी.

कारणे :

या रोगाचे प्रमुख कारण म्हणजे छातीच्या आतील एक विशेष ग्रंथी थाईमस ग्रंथी छातीच्या आत, पण हृदयाच्या बाहेरच्या बाजूला असते. या थायमस ग्लॅडमध्ये ट्यूमर असतो, त्यामुळे तिचा आकार वाढतो. म्यास्थिनिया रोगामध्ये 90 टक्के रुग्णांमध्ये ही थाईमस ग्रंथीच जबाबदार असते, बाकी 10 टक्के प्रकरणात ऑटो इम्यून रोगच जबाबदार असतात.

लक्षणे

प्रारंभिक अवस्थेत म्यास्थिनियामध्ये केस विंचरण्यात अडचण येते. खूप हलके सामान उचलले तरीही व्यक्तीला थकवा येतो. अगदी 2-3 पायर्‍या चढल्या किंवा सामान्य वेगाने चालण्यासही त्रास होतो. विकाराची तीव्रता वाढल्यास डोळ्याच्या पापण्या वरच्या बाजूला उघडण्यास त्रास होतो. दोन्ही डोळे फार वेळ उघडे ठेवणेही कठीण असते. डोळे पूर्ण बंद करणे शक्य होत नाही. तसेच डोळे एका ठिकाणी केंद्रीत करता येत नाहीत. चेहरा अगदीच भावरहित शून्यात हरवल्यासारखा दिसतो. ओठ बाहेरच्या बाजूला निघतात.

Back to top button