scabies : तुम्हालाही त्वचेला सतत खाज सुटते का? जाणून घ्या कारण... | पुढारी

scabies : तुम्हालाही त्वचेला सतत खाज सुटते का? जाणून घ्या कारण...

scabies : खरूज हा एक त्वचारोग आहे. खाज येणारा, संसर्गजन्य असा हा त्वचारोग आहे. सार्कोपटीस स्कबीई या परजीवीमुळे हा त्वचारोग होतो.

अष्टपाद प्रकारचा खरूज हा परजीवी असतो. हा जीव अतिशय सूक्ष्म म्हणजे मिली मीटरचा एक तृतीयांश एवढा लांब असतो. तो त्वचेत शिरतो आणि त्वचेला कंड सुटतो. रात्रीच्यावेळी खाजेची तीव्रता वाढते. 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात हे परजीवी जगू शकत नाहीत. पण 20 अंश सेल्सिअसला तग धरून राहतात.

खरूज scabies हा त्वचारोग सर्वत्र आढळतो. तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. त्वचेच्या स्पर्शाने हा रोग पसरतो. रोगाचे जंतू परजीवी असल्याने, ते 24-36 तासच जगू शकतात. एकमेकांच्या स्पर्शाने हा रोग पसरत असल्याने बाधित व्यक्तीपासून दूर राहिल्यास संसर्ग टाळता येतो.

रुग्णाच्या बिछान्यावरील चादरी, उषा, बेडशीट इत्यादी कपडे गरम पाण्याने (50 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा जास्त गरम) धुवावेत म्हणजे त्यांतील जंतू नष्ट होतील.

scabies अचूक निदान आणि उपचारासाठी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शरीराची स्वच्छता ठेवणे हे खरूज होऊ नये म्हणून तसेच झाल्यास त्याचा उपचार म्हणून गरजेचे आहे. रोज अंघोळ करण्याचा सल्ला यासाठीच दिला जातो.

हे ही वाचा :

Health : ‘स्लिप डिस्क’, दूर्लक्ष करू नका; जाणून घ्या कारण-लक्षणे आणि उपाय

Health Tips : तुम्हालाही हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास होतोय ? तर या टिप्स तुमच्यासाठी

Back to top button