तुमच्या सकाळची सुरुवातही फळे खाऊन होते? वाचा तज्ज्ञांचे काय मत आहे… | पुढारी

तुमच्या सकाळची सुरुवातही फळे खाऊन होते? वाचा तज्ज्ञांचे काय मत आहे...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्यापैकी बहुतेक जणांची सकाळ चहा किंवा कॉफीने होत असते. अनेकांची तर झोपच चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय जात नाही. पण काही फिटनेस प्रेमी लोक मात्र फळ खाऊन दिवसाची सुरुवात करताना दिसतात. अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावर फळांचा नाश्ता करत असल्याचं आवर्जून सांगतात. अनेकदा सकाळी फळांचा ज्यूसही घेतला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? फळांच्या ज्यूस ऐवजी फळ खाणं शरीरासाठी कधीही चांगलं. कारण फळांमध्ये वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते.

यासोबतच सकाळी सकाळी केलेले फळांचे सेवन दिवसभराच्या गोड खाण्याच्या इच्छेवर प्रभावी ठरतं असं संशोधना अंती दिसून आलं आहे. पण फळांची निवड कोणती करता हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. अनेक आहारतज्ज्ञ आणि फिटनेस गुरूंनी सकाळी केळी सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं आहे.

केळी ही शरीराला मिळणारा उर्जेचा मोठा स्त्रोत बनू शकतो. सकाळी केळी खात असाल तर एक ते दोन तास आवश्यक उर्जेचा पुरवठा शरीराला होत राहतो. त्यामुळे तुम्हाला पूर्ण नाश्ता करण्यास वेळ मिळत नसेल तर केळी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ताणतणाव जाणवत असेल तर किंवा सकाळी उठल्यावर अनेकांना थकल्यासारखे वाटत राहते. त्यावर सकाळी केळी खाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.

पोट साफ न होणं किंवा चहा पिल्याशिवाय पोट साफ न होणं ही समस्या अनेकांना भेडसावत असते. अशा लोकांसाठी केळी हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

पण अनेकांना केळी खाणं आवडत नाही अशा लोकांसाठी बेदाणे आणि बदाम हा सर्वोत्तम पर्याय आहे. सकाळी उठल्यावर ६- ७ भिजवलेले बेदाणे खाल्ल्याने दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते. विशेषत: Pre menstrual syndrom ला तोंड देत असलेल्या स्त्रियांनी बेदाणे खाणे फायदेशीर ठरते.

केळी आवडत नसतील तर…

त्या त्या सीझनला उपलब्ध असलेली कोणतीही फळं खाऊ शकता. पण चहा आणि कॉफीचा अतिरेक टाळण्यासाठी सकाळी फळं खाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.

हे ही वाचा :

Walking benefits : जेष्‍ठांनी हृदयविकार टाळण्‍यासाठी दररोज किती पावले चालावी?, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील माहिती

निर्यातीतील ’स्मार्ट’ भरारी

Back to top button