अंजिराचे आरोग्यलाभ | पुढारी

अंजिराचे आरोग्यलाभ

अंजिरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए, बी, सी बर्‍याच प्रमाणात मिळतात. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असते. यांच्या सेवनाने गॅसेसची तक्रार दूर होते. अपचन, अ‍ॅसिडिटी, गॅसेसचा त्रास होणार्‍या व्यक्तींनी दररोज सकाळ, संध्याकाळ 1 ते 2 अंजीर खावीत. किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्ल्याने बौद्धिक व शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन ते चार अंजीर नियमितपणे खावीत.

यामुळे मूत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचा रस अथवा तसेच अंजीर खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्ल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते. अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. अंजीर शक्तिवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणी प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

-डॉ. जयदेवी पवार

Back to top button