दिवसात पाचपेक्षा अधिकवेळा ओठ चावता का? मग जरा दमानं घ्या! अन्यथा… | पुढारी

दिवसात पाचपेक्षा अधिकवेळा ओठ चावता का? मग जरा दमानं घ्या! अन्यथा...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ओठ चावता का : आधुनिक जीवनशैलीत मानसिक तणाव हा जगण्‍याचा भाग झाला आहे. मात्र या मानसिक तणावामुळे आपल्‍याला काही शारीरिक सवयी लागतात. त्‍यातील एक म्‍हणजे ओठ चावणे ही सवय. तुम्‍ही दिवसभरात पाचपेक्षा अधिकवेळा ओठ चावताय तर तुम्‍हाला शारीरिक किंवा मानसिक आजार आहेत का हे तपासणे आवश्‍यक ठरते . सहजपणे किंवा अजाणपणे वारंवार ओठ चावताय तर ही आरोग्‍यावर होणार्‍या परिणामाची खूणच असते. जाणून घेऊया ओढ चावण्‍यामागील कारणांविषयी…

बहुतांशवेळा चिंताग्रस्‍त असणार्‍या व्‍यक्‍तीला ओठ चावण्‍याची सवय असते. यामागे शारीरिक किंवा मानसिक कारणे असतात.
ओठ चावण्‍याची सवय असलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या ओठांवर वेदनादायक फोड येतात.

हा सवयीचा भाग झाल्‍याने सुरुवातीला याचे दुष्‍परिणाम दिसत नाहीत.

मानसिक तणावात असणार्‍या व्‍यक्‍ती तोंडात बोलताना किंवा एखादा पदार्थ चघळण्‍यासाठी ओठ चावतात.

सतत एका दडपणात राहणे, चिंता, भावनिक अस्‍थिर भावनांना प्रतिसाद म्‍हणून ओठ चावण्‍याची सवय लागू शकते. मात्र ही सवय लवकर लक्षात येत नाही.

ओठ चावता का : ओव्‍हरबाईट आणि अंडरबाईट

तुम्‍ही दिवसभारत पाचपेक्षा अधिकवेळा ओठ चावत असाल तर यामागील शारीरिक वा मानसिक कारणे ओळखणे आवश्‍यक आहे.
मुख व दंतरोग तज्‍ज्ञांच्‍या ही सवयी मुखरोगांमुळे लागू शकते.

पाचपेक्षा अधिक वेळा ओठ चावण्‍याची सवय असणार्‍या व्‍यक्‍तीला साधेदुखीचाही त्रासची लक्षणे असू शकतात. तसेच संधीवाताचीही लक्षणं असू शकतात, असे वैद्‍यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

शारीरिक त्रासामुळे नकळत व्‍यक्‍तीला ओठ चावण्‍याची सवय लागू शकते. शारीरिक वेदना कमी करण्‍याच्‍या भावनेने नकळत ओठ चावले जातात.

प्रचंड डोकेदुखी असेल किंवा दात दुखत असेल तरीही ही कृती नकळत होते.

मानसिक तणावामुळे दात एकमेकांवर घट आवळण्‍याची सवय लागते.

यातूनच विनाकारण जबडा आवळत ओठ चावण्‍याची सवय लागू शकते.

दात वेडेवाकडे असतील तर ही समस्‍याउद्‍भवते. मात्र ही फार मोठी समस्‍या नाही. यावर दंतरोग तज्‍ज्ञांकडून योग्‍य उपचार घेतल्‍यास या समस्‍येतून सुटका होवू शकते.

या सवयीमुळे ओठांवर वेदनादायक फोड येणे किंवा सूज येते, ओठ लालसर होतात

ओठ चावणे ही मानसिक समस्‍या असेल तर अशा व्‍यक्‍तीला समुपदेशनाचा फायदा होतो.

चिंता आणि नैराश्‍यग्रस्‍त व्‍यक्‍तीलाही विनाकारण ओठ चावण्‍याची सवय लागते.

एखादी व्‍यक्‍ती सातत्‍याने अशी कृती करत असेल तर ताे चिंताग्रस्‍त किंवा नैराश्‍याने ग्रासलेला असताे.

सतत एका दडपणात राहणे, चिंता, भावनिक अस्‍थिरता कमी करण्‍यासाठी या भावनांना प्रतिसाद म्‍हणून ओठ चावण्‍याची सवय लागू शकते. मात्र ही सवय लवकर लक्षात येत नाही.

आत्‍मकेंद्रीत लोक ही ओठ चावून स्‍वत:ला दुखापत करुन घेतात, असे निरीक्षणही मानोपसचार तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.

शारीरिक व मानसिक आरोग्‍याबाबत विचार करा

मानसिक तणावामुळेही ओठ चावण्‍याची सवय लागू शकते.

तुम्‍ही दिवसभरात कधी तरी ओढ चावणे ही सामान्‍यबाब आहे. मात्र हीच कृती वारंवार होवू लागवु तरी तुम्‍हाला असणार्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍याबाबत विचार करावा लागणार आहे.

लहान मुले जर वारंवार ओढ चावत असतील तर मुख व दंतरोग तज्‍ज्ञांकडे उपचार घेणे आवश्‍यक असते.
जबड्यावर उपचार करुन तुम्‍ही या सवयीपासून मुक्‍त होवू शकता.

ही सवय जर शारीरिक नसेल. तर तत्‍काळ तुम्‍ही मानसोपचार तज्‍ज्ञांची मदत घेणे गरजेचे ठरते.

मानसिक उपचारामुळे विविध सवयीमधून मुक्‍त होता येते.

वारंवार ओढ चावणे या कृतीमागे शारीरिक व मानसिक आजाराचे लक्षण असतात. याची माहिती घेवून योग्‍य उपचार घेतले तर या त्रासदायक सवयीतून तुम्‍ही मुक्‍त होवू शकता.

हेही वाचलं का ? 

  • पाहा व्‍हिडिओ : कोल्हापूरच्या तरुणाने केला मधमाशीपालनाचा यशस्वी उद्योग 

Back to top button