अपत्य प्राप्तीसाठीच्या टिप्स (Male Factor) | पुढारी

अपत्य प्राप्तीसाठीच्या टिप्स (Male Factor)

डॉ. प्रविण हेन्द्रे

पर्यावरण व बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक दाम्पत्यांना ‘आपले करिअर’ करण्याच्या धावपळीमध्ये आपण रजोनिवृत्तीजवळ केव्हा पोहोचलो, याचे भानच रहात नाही. मग पळापळ सुरू होते, ती अपत्य प्राप्तीच्या उपचाराची. अंगारे, धुपारे, देवदेव, ऐकीव माहितीच्या आधारे गरोदर होण्यासाठीचे प्रयत्न थकले की, त्यांना स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जावे लागते. बर्‍यास वेळेस सासूबाई आपल्या सुनेला मूल होत नाही म्हणून दवाखान्यात घेऊन येतात. परंतु, मूल होण्यामध्ये पती व पत्नीचा दोघांचा समान वाटा (सहभाग) असतो, हे सोयीस्करपणे विसरलेले असते. किंबहुना पुरुषांची तपासणी ही अगदी सोपी व सुलभ असते. त्याकरिता एक शारीरिक तपासणी व वीर्यचिकित्सा करावी लागते. धातू किंवा वीर्य तपासणीसाठी  तीन दिवस समागम केलेला नसावा लागतो व लॅबोरेटरीमध्येच हे वीर्य हस्तमैथुनाद्वारे एका निर्जंतुकीकरण केलेल्या डबीमध्ये तपासणीसाठी घ्यावे लागते.

या विर्याची (धातू)  तपासणी करीत असता, त्याची मात्रा किती मिली आहे, व त्याचा रंग धुरकट आहे किंवा पिवळा अथवा रक्‍तमिश्रित आहे, हे पहावे लागते. तसेच वीर्य जेव्हा शरीराबाहेर टाकले जाते, तेव्हा ते घट्टसर असते व साधारणत: 30 मिनिटांमध्ये ते द्रवरूपात रुपांतरित होते. त्याला Viscosity ची तपासणी असे संबोधतात. हे वीर्य मेक्‍लर्स  Meckler’s chember च्या सहाय्याने सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे तपासले जाते. त्यामध्ये त्यांची एका मिलीमधील संख्या तसेच 100 पैकी किती शुक्राणू अतिचपळ, साधारण चपळ किंवा मंदपणे हालचाल असणारे किंवा निर्जीव (Dead) आहेत, याचे प्रमाण पाहिले जाते. त्याचबरोबर 100 शुक्राणूंपैकी किती शुक्राणू सामान्य (Normal Morphology) आहेत, ते पहावे लागते. त्यांच्या गुणवत्तेसाठी शुक्राणूचे साधारण डोके व शेपूट कसे आहे, तर काही मोठ्या Head चे असतात, काहींना दोन डोके Head चे असतात, काहींना दोन शेपूट असतात. काहींना त्याची टोपी नसते. ही तपासणी गुणवत्ता अर्थात Morphology ची तपासणी असे संबोधतात. या सर्व तपासण्यानंतर त्या विर्याची खालीलप्रमाणे वर्गवारी केली जाते. 

सामान्य वीर्य (Normal) Normozospermia.

– Oligospermia शुक्राणूंची संख्या कमी असणे.

– Asthanozospermia शुक्राणूंमध्ये सामान्य चपळतेचा अभाव असणे.

-Teratozospermia शुक्राणू खराब गुणवत्तेचे म्हणजे डोके (Head)  व शेपटामध्ये दोष असणे.

Necrozosprmia  सर्व शुक्राणू निर्जीव (dead) असणे.

Azoospermia विर्यामध्ये शुक्राणूंचा अभाव (Count Zero) असणे.

असे दोष आढळतात. हे दोष कोणत्या कारणांमुळे होतात, तसे होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी व त्यावरील उपचार पुढील लेखात पाहू.

Back to top button