नांदेड : निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू | पुढारी

नांदेड : निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

 नांदेड : पुढारी वृत्तसेवा 

नांदेड शहरातील पिरबुऱ्हाणनगर भागातील पहिला कोरोनाग्रस्त आणि व उपचारानंतर कोरोना निगेटिव्ह ठरलेल्या त्या रुग्णाचा आज गुरुवार (दि. ३०) एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

वाचा :जेष्ठ वकील बबनराव देशपांडे यांचे निधन

कोरोना मुक्त असलेल्या नांदेड मध्ये २२ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. दरम्यान तो राहत असलेला पिरबुऱ्हान नगर सील करण्यात आला होता. शासकीय रुग्णालयात त्याच्यावर कोरोना रुग्ण विभागात उपचार सुरु होते. २७ एप्रिल रोजी या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. १४ दिवसानंतर परत एकदा अहवाल पाठवण्यात येणार होता. तो निगेटिव्ह आला तरच तो रुग्ण कोरोनामुक्त रुग्ण म्हणून घोषित होणार होता. मात्र आज गुरुवार ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उपचारा दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला. या वृत्तास निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांनी दुजोरा दिला आहे.

वाचा :हिंगोलीत आणखी तीन जवानांना कोरोनाची बाधा

Back to top button