कल्याण- डोंबिवली परिसरात कोरोनाचे नवे सहा रुग्ण | पुढारी

कल्याण- डोंबिवली परिसरात कोरोनाचे नवे सहा रुग्ण

कल्याण : पुढारी वृतसेवा

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला सर्वाधिक कोरोनाचा धोका मुंबई व मुंबई लगत असलेल्या शहरात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे होत आहे. गुरुवारी सापडलेल्या सहा रुग्णांपैकी चार रुग्ण मुबंईतील शासकीय व खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी व एपीएमसी मार्केट मधील कर्मचारी आहेत. तर उर्वरीत दोन रुग्णांपैकी एक रुग्ण वीस दिवसांचे नवजात बाळ आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये सहा रुग्णांची भर होऊन पालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या १६२ इतकी झाली आहे 

अधिक वाचा :  लॉकडाऊनच्या काळात ३३३ गुन्हे दाखल, १५२ लोकांना अटक

पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी नव्याने सहा रुग्ण सापडले असून त्यातील चार कर्मचारी हे मुंबई येथील रुग्णालयात व वाशी एपीएमसी मार्केटमध्ये काम करणारे आहेत. डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरात प्रत्येकी दोन दोन तर कल्याण पश्चिम व टिटवाळा पूर्व परिसरातील एक एक रुग्ण सापडले आहेत. या सहा रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेतील अवघ्या वीस दिवसाच्या बालकाचा व ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. डोंबिवली पश्चिमेतील ४५ वर्षीय दोघा पुरुषांना कोरोनाची लागण झाली असून दोघेही एपीएमसी मार्केट वाशी येथे कामाला आहेत. तर कल्याण पश्चिमेकडील ४० वर्षीय पुरुष हा मुंबईतील शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यारी व टिटवाळातील ४२ वर्षीय महिला ही मुंबई येथे खाजगी रुग्णालयातील कर्मचारी आहे. आजमितीस पालिका क्षेत्रात १६२ रुग्ण सापडले असून त्यामध्ये ३ मयत तर ४७ रुग्ण बरे झाले आहेत. 

अधिक वाचा :  मुंबई : सदाबहार अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन 

कल्याण डोंबिवली परिसरातील रुग्ण

कल्याण पूर्व – ३०, 

कल्याण पश्चिम -२१, 

डोंबिवली पूर्व  डोंबिवली पश्चिम -४१ 

मांडा टिटवाळा- ६ 

मोहणे – ६ 

नादिवली – १ 

एकूण  – १६२

अधिक वाचा :  ‘देशातील गरीबांच्या मदतीसाठी ६५ हजार कोटींची गरज’ (video)

Back to top button