लहान मुलं आणि संधिवात | पुढारी | पुढारी

लहान मुलं आणि संधिवात | पुढारी

डॉ. प्रदीप महाजन

लहान मुलांचा संधिवात अर्थात सोळा वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळणारा संधिवात ही एक वेगळीच समस्या आहे. मुलांमध्ये सांधेदुखीची समस्या उद्भवण्याची अनेक कारणे असतात.

जुवेनाईल आर्थ्ररायीस (जेए) अर्थात लहान मुलांचा संधिवात हा एक अनुवाशिंक आजार आहे. एखाद्या व्हायरसच्या संसर्गामुळेही हा आजार मुलांना होऊ शकतो. या आजारात शरीर स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला चढवते. परिणामी, सांध्यांवर सूज येऊ लागते. आपल्या शरीरात खांदे, कोपर, मनगटे, ढुंगण आणि गुडघे येथे हाडांचे प्रमुख सांधे असतात. या सांध्यांमुळे चालणे, उठणे व बसणे शक्य होते. परंतु, या आजारात एक सांधा जरी कमकुवत झाला, तरी आपल्या शरीराची हालचाल कमी होऊ लागते. त्यातच लहान मुलांना संधिवात झाला, तर त्यांची शारीरिक वाढ खुंटते आणि उभ्या आयुष्याचा प्रश्न उभा राहतो.

निदान

सध्याच्या परिस्थितीनुसार लहान मुलांमध्येही संधिवाताची समस्या जाणवू लागली आहे. या विकारात मुलांना तीव्र वेदना आणि सांधेदुखीमुळे शारीरिक हालचाली कमी होतात. बालवयात हा विकार झाल्याने मुलांना खेळताना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते.

जागतिक आकडेवारीनुसार यूएसएमध्ये अंदाजित 3,00,000 मुलं संधिवाताच्या दुखण्याने त्रस्त आहेत. भारतात साधारणतः 1.3 दशलक्ष लहान मुले या संधिवाताने ग्रासलेली आहेत. याशिवाय जगभरातील आकडेवारीनुसार अंदाजे 0.07-10/1000 व्यक्ती या आजारासह आयुष्य जगताहेत. विशेषतः लहान मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये संधिवाताचे दुखणं सर्वाधिक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील सिस्टमिक जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस हा संधिवाताचा आणखी एक प्रकार आहे.

संधिवाताचे निदान

• क्लिनिकल ट्रायलनुसार रक्ताचे नमुने घेऊन चाचणी करणे

संधिवात विकाराकरिता (र्‍हुमॅटॉईड फॅक्टर) अशा विविध चाचण्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत.

उपचार पद्धत –

संधिवात असल्यास हाडांची झीज आणि असह्य वेदना होतात. या वेदना दूर करण्यासाठी आवश्यक औषध आणि स्टेरॉईटचा वापर केला जातो. याशिवाय शरीराला पुरेसे व्हिटॅमिन मिळावेत, यासाठी औषधही दिली जातात.

• पौष्टिक आहाराचे सेवन करणे

• हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियम किंवा ड जीवनसत्त्व शरीराला कसे मिळतील, याकडे लक्ष द्यावे.

• नियमित फिजिओथेरपी करावी.

उपचाराचे उद्दिष्ट

• आजाराच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवणे

• हाडांची झीज न होता ती दीर्घकाळ योग्य पद्धतीने कार्य करतील

• शारीरिक वाढ आणि विकासाला प्रोत्साहन द्या

लहान मुलांच्या संधिवातावरील अत्याधुनिक उपचार पद्धती

• अँटी-सायटोकिन थेरेपी

• इम्युनोथेरेपी

• ट्रेगसेल थेरेपी

• एक्सोसोम्स

या उपचार पद्धतींमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे जुवेनाईल आर्थ्रायटिस असणार्‍या लहान मुलांवर हे उपचार फायदेशीर ठरतात. यामुळे मुलांच्या वेदना आणि जळजळ कमी होते. याशिवाय मुलांच्या शरीरातील ऊतींचे नुकसान होण्यापासूनही वाचवते.

Back to top button