कोरोनावर घरगुती औषधांचा उपाय   | पुढारी | पुढारी

कोरोनावर घरगुती औषधांचा उपाय   | पुढारी

डॉ. नटराज द्रविड 

व्हायरसचे जीवशास्त्र समजून न घेतल्यामुळे शासकीय व वैद्यकीय यंत्रणेचा फज्जा उडाला आहे. खरे तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोनावर घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. हळद, आले, माईनमूळ, जिरे, धने, वेलची, हरळी यांचा चांगला उपयोग करता येईल.

कोरोनाचा संसर्ग टाळणे अशक्यप्राय आहे, हे आता सिद्ध झाले आहे. टाळेबंदी, जनता कर्फ्यू, प्रतिबंधित क्षेत्र, सिमित प्रतिबंधित क्षेत्र ही सोंगे चालूच राहतील; पण यांना कोरोना पुरून उरेल. परंतु, कोरोनामुळे होणार्‍या सायटोकाईन स्टॉर्मच्या तीव्रतेला काही सोपी व घरगुती औषधे कमी करू शकतात. ती कशीप्रकारे, हे आपण या लेखात पाहूया. 

हळद : बाजारात मिळणारी हळद पूड ही ओल्या हळदीएवढी गुणकारी नाही. त्यातसुद्धा लागणीचे हळदीचे गड्डे हे त्याच्या आजूबाजूस तयार होणार्‍या फण्यांपेक्षा जादा गुणकारी असतात. आले, हळदीमध्ये जे नैसर्गिक तेल असते, ते हळदीमध्ये अत्यल्प असते, कारण हळकुंडे ही हळद उकळून बनवली जातात व हे तेल वाया जाते. ओली हळद न मिळाल्यास नेहमीची हळद वापरावी. बोटाएवढी ओली हळद किसून त्याचा रस घ्यावा, ओल्या हळदीमुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते. यासाठी औषधांवर असणार्‍या मधुमेहींनी त्यावर लक्ष ठेवावे. 

2) आले : हळद व आले एकत्र काम चांगले करते. यासाठी चमचाभर आल्याचा रस घ्यावा.

3) माईनमूळ : वजन कमी करणार्‍या या औषधीने सूज आणणारी सायटोकाईन्स कमी होतात. ही भाजी मंडईत उपलब्ध असणारे औषधी लोणचे म्हणून वापरण्यापेक्षा रस काढून वापरावी. माईनमुळाचा रस हा पाणी घालून चांगला निघतो.

4) जिरे, धने, बडीशेप, कलौंजी, वेलची : यांची पूड प्रत्येकी पाव चमचा, वाळा चूर्ण 1 चमचा हे 2 कप पाण्यात रात्री भिजत घालणे व सकाळी फक्त एक गरम उकळी देऊन गाळून घेणे. व्हायरस संसर्गाशिवाय लघवीला आग होणे, लघवीमध्ये जंतूसंसर्ग व याबरोबरच येणारा आमवात यासाठी हा उपाय उपयोगी पडतो. कोणत्याही तापात होणारी तगमग व पायात होणार्‍या जळजळीसाठी महागड्या औषधांऐवजी हे वापरून पाहा. कोणताही दुष्परिणाम न होता आपण कितीही वेळा हे मिश्रण घेऊ शकता. यात वापरलेली कलौंजी ही काळे जिरे म्हणूनही ओळखतात. कलौंजी म्हणजे कांद्याचे बी नव्हे, याचे शास्त्रीय नाव छळसशश्रश्रर ीरींर्ळींर असे आहे. खात्री करूनच वापरावी.

5) दूर्वा किंवा हरळी : ज्यावेळी देवीच्या साथी येत असत. त्यावेळी दूर्वांचा रस हे औषध देवीचे डाग पडू नयेत म्हणून देत असत. कणकवलीचे (कै.) करंबळेकर गुरुजी या औषधावर भर देत असत. सायटोकाईन स्टॉर्मच्या आधीच्या अवस्थांना बरे करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. 

30 ग्रॅम दूर्वा एकावेळी वापराव्यात. वापरापूर्वी दूर्वा गरम पाण्याने धुवून घ्याव्यात. मांजर-कुत्र्याचे मलमूत्र पडले असेल अशी शंका असलेल्या जागेवरून घेऊ  नयेत. अशी काळजी घेतली नाही तर या प्राण्यांचे कृमी व जंतू यांचा संसर्ग होऊ शकतो. दूर्वांचा रस मधाबरोबर घेतल्यास अधिक परिणामकारक आहे. पाणी घातल्याशिवाय व बारीक चिरल्याशिवाय दूर्वांचा रस निघत नाही. दूर्वाविषयी स्वतंत्र लेख लिहावा इतके हे साधे गवत गुणकारी आहे. 

सर्व औषधे म्हणून उपयुक्त घटक सहज उपलब्ध असतात. ज्यांनी माझे मागील दोन लेख वाचले असतील त्यांना सायटोकाईन स्टॉर्म हा कोरोनामध्ये खरा शत्रू आहे, हे समजले असेल व संसर्ग होणारच असेल तर हे साधे उपाय सुरू केल्यास गंभीर स्थिती टाळली जाऊ शकते. स्टेरॉईटशिवाय इतर नावाजलेली अ‍ॅलोपॅथी औषधे का उपयोगी पडत नाहीत याचे कारण सायटोकाईन स्टॉर्म आहे.

कमीतकमी आपण महासुदर्शन काढा किंवा चूर्ण व भल्लातकासव नियमित घेण्यास सुरुवात केली तर होणार्‍या आजाराची भयावहता कमी होईल. याशिवाय या आजारानंतर राहणार्‍या त्रासदायक खोकल्यासाठी डळश्रळलशर 12ु या बायोकेमिकच्या 6 गोळ्या 4 वेळा दहा दिवस घ्याव्यात. या लेखात वर्णन केलेल्या सर्व वनस्पती औषधी सायटोकाईन्सवर उपयुक्त परिणाम करतात. याशिवाय शास्त्रीय संशोधन उपलब्ध आहे. क्लिष्टता टाळण्यासाठी या संशोधनाविषयी उल्लेख केलेला नाही. हा लेख वैद्यकीय सल्ल्यास पर्याय म्हणून लिहीत नाही, तर सोपे, कमी खर्चाचे उपाय सर्वांपर्यंत पोहोचवावेत. 

Back to top button