एकदा सेक्स केल्यावर दुसरा सेक्स अर्ध्या तासानं करावा? | पुढारी

एकदा सेक्स केल्यावर दुसरा सेक्स अर्ध्या तासानं करावा?

पुढारी ऑनलाईन डेस्क

सेक्स (sex) हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. मग एकदा सेक्स केल्यावर दुसरा सेक्स हा अर्ध्या तासानं करावा का?; याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

डॉ. राहुल पाटील सांगतात, नवविवाहित जोडपे, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, बऱ्याच दिवसांनी भेटणारे जोडपे यात सेक्सचे प्रमाण जास्त असते. वेळ आणि खाजगी रूम आहे तर दोघांच्या इच्छेने सेक्स पुन्हा-पुन्हा होतो. पण एकदा सेक्स झाल्यावर परत करताना अर्ध्या तासानेच करावा असा काही नियम नाही. वयोमानानुसार पुरुषाच्या लिंगामध्ये पुन्हा-पुन्हा ताठरता येणे आणि स्त्रीसुद्धा उद्दीपित होणे हे अवलंबून असते. यावरच सेक्सची वारंवारता ठरते. शिवाय त्याची सेक्समधील आवड, पुढचा पार्टनर सक्रिय आहे का? यावर नंतर किती वेळाने सेक्स होणार हे ठरते. इथे दुसऱ्याच्या सेक्स करण्याशी, त्याच्या प्रमाणाशी तुलना करू नये.

डॉ. पाटील पुढे सांगतात की, सेक्स केल्याने ताण तणाव कमी होतो. नियमित सेक्स करणारी माणसं कमी आजारी पडण्याची शक्यता असते. नियमित सेक्स केल्याने केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक रूपानेही व्यक्ती फिट राहू शकते. सेक्स आणि ब्लड प्रेशरचं आपआपसात एक संबंध असतो, सेक्स ब्ल़ड प्रेशर संतुलित करतं, ब्ल़ड प्रेशर कमी करण्यात सेक्सची महत्वाची भूमिका असते. 

सेक्स लाइफ रिचार्ज कशी करायची?

लैंगिकसुख महत्त्वाचे की ब्रह्मचर्य महत्त्वाचे ?

सेक्स करताना कंडोम फाटला तर..!

विवाहपूर्व हस्तमैथुन केले तर विवाहानंतर सेक्स करण्याची इच्छा कमी होते का?

हस्तमैथुनाने वीर्यनाश होतो का?

मुलामुलींच्या हस्तमैथुन करण्याने विवाहानंतर देखील त्यांना फायदा होतो का?

Back to top button