जिममध्ये जाणाऱ्यांच्यात भारतीय आघाडीवर | पुढारी

जिममध्ये जाणाऱ्यांच्यात भारतीय आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिममध्ये भारतीय आघाडीवर आहेत. नुकतंच एक संशोधन जाहीर झाले आहे. त्य़ामध्ये स्पष्ट झाले की, भारत असा देश आहे की, आपल शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी पैसे खर्च करतात. पण आपल्या जिमची फी देवूनही त्यातील ७६%  लोक जिमला जात नाहीत.  हे असूनही भारतीय जगात फिटनेस प्रेमी आहेत. आपला फिटनेस चांगला राखण्यासाठी जिमचा वापर करणारे भरपूर लोक आहेत. आणि जिम लोकप्रियही आहेत.

आजच्या काळात बऱ्याच जणांना जास्त वजन ही समस्या जाणवते. यावर खर्‍या अर्थाने एकच उपचार आहे, तो म्हणजे शारीरिक मेहनत. अनेक प्रकारचे प्रयोग करणे, पण सर्वात प्रभावी प्रयोग म्हणजे व्यायाम. हे व्यायाम कोणत्याही स्वरूपात असू शकताे, एकतर मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम किंवा वजन प्रशिक्षण. पण जिममध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कोरोना काळात तर अनेकांची वजने वाढली. अनेकांनी चांगल्या तब्येतीसाठी जीम लावली.

स्टेटिस्टा ग्लोबल कंज्यूमर (Statista Global Consumer survey) सर्व्हेनुसार भारतात ७६% लोक असे आहेत जे वर्षभराची जिमची  भरुनही जिमला जाणे टाळतात. २४ % लोक हे जिमचे पूर्ण पैसे भरुन आपल्या चांगल्या तब्येतीसाठी जातात. एवढे असुनही भारत जगात फिटनेस प्रेमी आहेत.

दुसऱ्या नंबरावर दक्षिण आफ्रिका आहे. द. आफ्रिकेतील २१% असे लोक आहेत जे जिमचे पूर्ण पैसे भरुन आपल्या फिटनेससाठी जिममध्ये जातात. स्टेटिस्टाच्या सर्व्हेनुसार जिमचे पुर्ण पैसे भरुनही जिमला न जाणाऱ्यांची संख्या का आहे. तर वेळ नसणे हे कारण पुढे आले आहे. 

या सर्व्हेत दिसुन आले आहे की, फ्रान्स मधील लोक जिमसाठी उदासिन  आहेत. तेथिल ४ % लोकांनी जिमसाठी खर्च केला आहे. तर भारतीय लोक हे सर्वाधिक फिटनेस फिक्र आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button