लोहयुगातील खजिना | पुढारी | पुढारी

लोहयुगातील खजिना | पुढारी

 ज्ञानात भर

दक्षिण जर्मनीतील एका शेतकर्‍याला नुकताच त्याच्या शेतात नांगरणी करताना लोहयुगातील खजिना सापडला. 2600 वर्षांपूर्वीचा हा खजिना सोने, ब्रांझ व अ‍ॅम्बरपासून बनवलेल्या दागिन्यांनी भरलेला होता. हा खजिना एका प्राचीन कबरीत सापडला असून तीस ते चाळीस वर्षांच्या स्त्रीची ही कबर आहे. डॅन्युब नदीच्या जवळ हेनबर्ग किल्ल्याच्या पायथ्यालगतच्या शेतात ही कबर सापडली. कबरीतील स्त्री ही प्राचीन सेल्टिक समाजातील एखादी प्रतिष्ठित स्त्री असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. ख्रिस्तपूर्व 358 या काळात ही कबर बनवण्यात आली असावी, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Back to top button