प्रवाळ सापळा | पुढारी | पुढारी

प्रवाळ सापळा | पुढारी

प्रवाळ हा एक समुद्रातील जलचर आहे. जेव्हा हा जलचर मरतो तेव्हा तो पांढर्‍या रंगाचा होतो व मानवी अस्थींप्रमाणे भासू लागतो. प्रवाळाच्या याच वैशिष्ट्याचा वापर फिलिपाईन्सचा एक शिल्पकार ग्रेगरी रेमंड हलिलीने करायचे ठरविले. मृत प्रवाळांपासून ग्रेगरीने हुबेहूब माणसाच्या सापळ्यासारखा दिसणारा सापळा बनविला आहे.

माणसाच्या अस्थींशी साधर्म्य साधतील असे प्रवाळ तुकडे शोधण्यासाठी ग्रेगरीने अनेक वर्षे फिलिपाईन्समधील कॅलाटागान, अ‍ॅनिलाओ व बोलिनाओ या समुद्र किनार्‍यांवरील वाळूमध्ये व उथळ समुद्रात व्यतीत केली. त्याला सर्वाधिक वेळ माणसाच्या कवटीच्या आकाराएवढा प्रवाळ शोधताना लागला. मात्र त्याने हार मानली नाही. 

अपेक्षित प्रवाळ तुकडे शोधल्यानंतर ते तुकडे त्याने स्टेनलेसची सुई व सुपर ग्लु यांचा वापर करून जोडले. यामुळे अपेक्षित परिणाम साधला गेला. सुमारे सहा फूट लांबीचा हा प्रवाळ सापळा लांबून पाहिल्यावर खरोखरच मानवी सापळा वाटतो व जवळून पाहिल्याशिवाय प्रवाळांचा बनलेला आहे हे समजत नाही.
 

संबंधित बातम्या

Back to top button