मोईन जुनेदी | पुढारी | पुढारी

मोईन जुनेदी | पुढारी


मोईन जुनेदीच्या शरीरात तेवढी हाडे नसतील जेवढ्या वेळा त्याची हाडे फ्रॅक्चर झाली आहेत. ओस्टोजेनेसिस इंपरटेक्टा या दुर्मीळ आजाराने ग्रस्त मोईन केवळ खोकला तरी त्याची हाडे मोडतील एवढी त्याची हाडे कमजोर आहेत. तरीही हा पठ्ठ्या डगमगला नाही. 2013 साली अपंगांच्या पोहोण्याच्या जागतिक स्पर्धेत 50 मीटर्स बॅक स्ट्रोक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून मोईनने सर्वांनाच चकीत केले. व्हिलचेअरवर खिळलेल्या मोईनला यामुळे वंडर बॉय असे नाव प्राप्‍त झाले आहे. मोईनच्या या कामगिरीची दखल शाहरूख खान, दीपिका पदुकोण, रणबीर सिंग या बॉलिवूडच्या कलाकारांनीही घेतली. मुंबईला बोलावून त्यांनी मोईनचे कौतुकही केले. या वंडर बॉयने दाखवून दिले की अपंगत्व तुमच्या ध्येयाच्या आड येऊ शकत नाही.


 

संबंधित बातम्या
Back to top button