भारतीय ज्युरासिक पार्क | पुढारी | पुढारी

भारतीय ज्युरासिक पार्क | पुढारी

गुजरातची राजधानी गांधीनगर येथील साबरमती नदीच्या दोन्ही काठावर सुमारे 400 हेक्टर जमिनीत पसरलेले इंद्रोदा डायनासोर व फॉसिल पार्क म्हणजे बच्चे कंपनीसाठी एक निराळेच विश्‍व आहे. याला भारतीय ज्युरासिक पार्क असेही संबोधतात. गुजरात इकॉलिजिकल एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेद्वारे चालविण्यात येणारे हे देशातील एकमेव डायनासोर पार्क आहे. विविध प्रजातींच्या डायनासोरचे खरेखुरे वाटतील असे भव्य पुतळे व डायनासोरची जीवाश्मात रुपांतरीत झालेली खरीखुरी अंडी येथे पहायला मिळतात. पार्कमध्ये एक प्राणी संग्रहालय, निळ्या देवमाशासहीत अनेक विशाल जलचरांचे सांगाडे, एक वनस्पती उद्यान, अ‍ॅम्फी थिएटर, कँपिग फॅसिलिटीज आहेत. याशिवाय पार्कच्या परिसरात अनेक प्रजातीचे प्राणी पहायला मिळतात. या भारतीय ज्युरासिक पार्कला एकदा तरी भेट जरूर द्यायला हवी.

Back to top button