धोकादायक जनुक | पुढारी | पुढारी

धोकादायक जनुक | पुढारी

19 व्या शतकात न्यूझीलंडमध्ये अनेक व्यापारी जहाजांमुळे उंदीर, मुंगूस वगैरे परकीय प्राण्यांचा शिरकाव झाला. या प्राण्यांनी स्थानिक किवी व इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात नाश केला. या पक्षी प्रजातींना वाचविण्यासाठी केंब्रिजच्या मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूटच्या केव्हिन इसवेल्ट या शास्त्रज्ञाने जीन एडिटिंग हे नवे तंत्र विकसित केले आहे. या तंत्रानुसार परकीय प्राण्यांच्या जनुकीय प्रणालीत असे जनुक टाकता येईल ज्यामुळे मूळ जन्म प्रदेश वगळता इतर ठिकाणी परकीय प्राणी जास्त काळ जगू शकणार नाही.मात्र हे संशोधन वादाच्याभोवर्‍यात सापडले आहे. काही शास्त्रज्ञांचा अशा प्रकारच्या जीन एडिटिंगला विरोध आहे. याचे कारण प्राण्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या नैसर्गिक प्रेरणेला हे संशोधन मारक ठरेल. तसेच हे जनुक परकीय प्राण्यांच्या जनुकीय प्रणालीतच कायम राहील का याबाबत शास्त्रज्ञ साशंक आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button