विज्ञान प्रश्‍नोत्तरे : कृत्रिम प्रथिने म्हणजे काय? | पुढारी

विज्ञान प्रश्‍नोत्तरे : कृत्रिम प्रथिने म्हणजे काय?

कृत्रिम प्रथिने मानवाद्वारे निर्मित नैसर्गिक प्रथिनांची रेण्वीय नक्कल असते. या कृत्रिम प्रथिनांची रचना व कार्यप्रणाली नैसर्गिक प्रथिनांप्रमाणे असते. प्रथिने कोणत्याही जीवित शरीरासाठी अत्यावश्यक असतात. याचे कारण पेशींचे कार्य प्रथिनांद्वारे नियंत्रित केले जाते. मानवी शरीर सुमारे एक लाख विभिन्न प्रथिने बनवते.

2011 साली प्रिन्सटन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम प्रथिने बनवण्यात यश मिळवले. कृत्रिम प्रथिनांचे निर्माण ही जीवशास्त्रातील एक क्रांतिकारक घटना आहे. यामुळे अनेक विकारांवर विजय मिळवण्यात मानवाला यश येईल, असे शास्त्रज्ञांना वाटते.

संबंधित बातम्या
Back to top button