सी बिन | पुढारी | पुढारी

सी बिन | पुढारी

जगभरात दरवर्षी दीड कोटी टन कचरा समुद्रात सामावला जातो. यामुळे सागरी जलचरांचे जीवन धोक्यात येतेच शिवाय समुद्र किनारेही प्रदूषित होतात. समुद्रातील या कचर्‍याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘वन ओशन वन लव्ह’ या कंपनीने ‘सी बिन’ नावाचे एक पंप जोडला आहे जो समुद्राचे  पाणी ताशी 25 हजार लिटर या वेगाने खेचत राहतो.

लाटांवर तरंगणारा कचरा या पाण्याबरोबर उपकरणाच्या ट्रॅश कॅनमध्ये जमा होतो व पाणी बाहेर टाकले जाते. सी बिन तासाला सुमारे दीड किलो कचरा समुद्रातून जमा करू शकतो. अगदी 2 मि.मी. आकाराचे प्लास्टिकचे कणही यात जमा होतात. बंदर, यॉट क्लब, गोदी किंवा अन्य कोणत्याही जलस्रोताजवळ हे उपकरण सहजपणे बसविता येते. या उपकरणाला जोडलेल्या पंपाचा वीजेचा खर्चही दरदिवशी केवळ 80 रुपये येतो.

 

हाताळण्यास सोपे, स्वस्त व परिणामकारक असे हे सी बिन उपकरण समुद्र स्वच्छ ठेवून पर्यावरण रक्षणाचे काम  करते.

संबंधित बातम्या
Back to top button