एपिसियॉन हायडेनी | पुढारी | पुढारी

एपिसियॉन हायडेनी | पुढारी

आजच्या श्‍वानाचा आद्य पूर्वज असलेला एपिसियॉन हायडेनी एक मोठा मांसाहारी श्‍वानवर्गीय प्राणी होता, जो मिओसिन युगात म्हणजे दीड कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. हा प्राणी सुमारे पाच फूट लांबीचा होता व त्याचे वजन 91 ते 136 किलो होते. याला विशाल डोके व मजबूत जबडा लाभलेला होता. त्याचे डोके सिंहाच्या डोक्यासारखे होत, सुळे अतिशय मोठे होते आणि शरीराचा रंग तपकिरी व पांढरा होता.

श्‍वानवर्गीय प्राण्यांपैकी सर्वात मोठा असलेला हा प्राणी उत्तर अमेरिका खंडात राहत होता. याचे जीवाश्म अल्बर्टो, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, नेब्रास्का, कन्सास, न्यू मेक्सिको, टेक्सास या राज्यांत व कॅनडा या देशात आढळले आहेत. उंट, काळवीट, जंगली घोडे, गेंड्यासारखे मोठे शाकाहारी प्राणी मिओसिन युगात अमेरिकेत अस्तित्वात होते. या प्राण्यांची शिकार एपिसियॉन हायडेनी करत होता. शिकार करण्यासाठी याला इतर प्रागैतिहासिक श्‍वान व मार्जार वर्गीय प्राण्यांशी स्पर्धा करावी लागे.

संबंधित बातम्या
Back to top button