कथा : कावळ्याचे दिवस, मोराचे दिवस | पुढारी

कथा : कावळ्याचे दिवस, मोराचे दिवस

गट्टू नावाचा एक कावळा महासागरात प्रवास करणार्‍या मालवाहू जहाजावर बसून मजेत वारा खात होता. एवढ्यात त्याला एक सुंदर बेट दिसले. गट्टू लगेच उडत जाऊन त्या बेटावरील एका झाडाच्या फांदीवर बसला. त्या बेटावर एकही पक्षी नव्हता, त्यामुळे बेटावरील लोकांना कावळ्याला पाहून आश्‍चर्य वाटले. ‘किती विचित्र पक्षी आहे हा,’ असा विचार त्यांच्या मनात आला. तरीही त्याचे काळे कुळकुळीत शरीर पाहून व काव काव असा आवाज ऐकून बेटावरील लोक प्रभावित झाले. ते रोज त्याला काही ना काही खायला घालू लागले. गट्टूची तर चैनच झाली.

एके दिवशी सौंदर्य नावाचा मोर त्या बेटावर आला. मोराला पाहून लोक तर अचंबित झाले. त्याचा मनोहारी पिसारा व नृत्य यावर लोक एवढे मंत्रमुग्ध झाले की लोक गट्टूला विसरूनच गेले. सौंदर्य मोर आता आकर्षणाचा केंद्रबिंदू झाल्यामुळे गट्टूला पूर्वीप्रमाणे खायला मिळेनासे झाले. काही दिवस दुर्लक्षित राहिल्यानंतर गट्टूला ते बेट सोडणे हितावह वाटले. 

एक दिवशी समुद्रात एक जहाज दिसताच गट्टू त्या बेटावरून उडून त्या जहाजावर बसला व पुन्हा त्या बेटावरील लोकांना तो कधीच दिसला नाही.

संबंधित बातम्या

Back to top button