वीरबालक : मुस्कान व सीमा | पुढारी

वीरबालक : मुस्कान व सीमा

26 जानेवारी 2019 या भारताच्या प्रजासत्ताक दिनी ज्या बालवीर व वीरबालांचा सन्मान ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ देऊन करण्यात आला; त्यात मुस्कान व सीमा या दोन शाळकरी मुलींचाही समावेश होता. हिमाचल प्रदेशातील एका गावात राहणार्‍या दोन मुलींनी जे धाडस दाखविले त्यापासून इतर मुलींनीही प्रेरणा घ्यायला हवी. 

मुुस्कान व सीमा ज्या शाळेत शिकतात त्या भागात उपद्रवी व उडाणटप्पू तरुणांचा त्रास नित्याचाच होता. ही किशोरवयीन मुले शाळेत शिकणार्‍या मुलींना नेहमी त्रास देत व छेडछाड करत. मुस्कान व सीमा एकदा शाळेत जात असताना एका तरुणाने त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन मुलींनी घाबरून पळ काढला नाही किंवा दुर्लक्षही केले नाही. त्या बदमाश तरुणाला पकडून त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. मुस्कान व सीमाने धैर्य दाखवल्याने शाळेतील इतर विद्यर्थिनींनीही हिंमत दाखवली व शाळेतील विद्यर्थिनींची छेडछाड थांबली. अन्याय सहन करू नका, अन्यायाचा प्रतिकार करा असाच संदेश या दोघी आपल्याला देतात.

संबंधित बातम्या
Back to top button