कथा : संगत | पुढारी | पुढारी

कथा : संगत | पुढारी

एकदा एक शेतकरी गाढव विकत घेण्यासाठी बाजारात गेला. एका गाढव विकणार्‍याला त्याने सांगितले की, तो गाढवाची परीक्षा घेईल मगच पैसे देईल. गाढव विक्रेत्याने याला मान्यता दिली. शेतकरी गाढवाला घरी घेऊन गेला व इतर गाढवांबरोबर त्याला कोंडवाड्यात सोडून दिले. त्या नव्या गाढवाने एका गाढवाशी लवकरच मैत्री केली, जे अतिशय आळशी होते व भरपूर गवतही खायचे. शेतकर्‍याने त्या गाढवाला मालकाच्या ताब्यात नेऊन सुपूर्द केले.

“हे गाढव मला नको,’’ शेतकरी म्हणाला.

“पण का?“ गाढव विक्रेता चकित झाला, “हे गाढव तर चांगले मजबूत आहे.’’

“मला आळशी गाढव नको,’’ शेतकर्‍याने उत्तर दिले व तो चालता झाला.

गाढव विक्रेता शेतकर्‍याच्या या उत्तराने चकित झाला. या शेतकर्‍याला कसे कळले की, गाढव आळशी आहे, याचाच तो विचार करत बसला.

तात्पर्य : आपण ज्यांची संगत करतो, त्यांचेच गुण उचलतो.

संबंधित बातम्या

Back to top button