भारत दर्शन : गोपालक शब्बीर मामू | पुढारी

भारत दर्शन : गोपालक शब्बीर मामू

गोरक्षणासाठी उभे आयुष्य वेचणारे शब्बीर सय्यद मामू यांची ओळख गायी पाळणारे शब्बीर मामू अशीच आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवंडी या गावात 13 जणांचे कुटुंब सांभाळणारे शब्बीर मामू गेली 50 वर्षे शेकडो गायींचा सांभाळ करत आहेत. त्यांच्या 65 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो गायींना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचविले. 

बहुतेक गायी भाकड, तरीही शब्बीर मामू गायींना मुलांपेक्षा जास्त ममतेने सांभाळतात. त्यांच्या चारापाण्याचा खर्च त्यांना परवडत नाही तरीही ते एका जिद्दीने गोपालन करतात. गायीपासून त्यांना वर्षभरात मिळणारे थोडेफार उत्पन्न हे त्यांच्या मोठ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन.

शब्बीर मामूंना भारत सरकारकडून 26 जानेवारी 2019 साली जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हीच एक समाधानाची बाब म्हणता येईल. गायी सांभाळण्यासाठी वारंवार आवाहन करूनही पुरेशी मदत मिळत नसल्याचे शल्य शब्बीर भाईंना सतावते तरीही ते गोपालनाच्या व्रतापासून ढळलेले नाहीत.

 

संबंधित बातम्या

Back to top button