क्रांतिकारक शोध : पॉलिमर क्ले | पुढारी

क्रांतिकारक शोध : पॉलिमर क्ले

पीव्हीसी म्हणजेच पॉली-विनाईल क्लोराईडपासून बनवण्यात येणारी पॉलिमर क्ले प्रत्यक्षात माती नसते. तरीही मातीप्रमाणे पाणी मिसळून या पदार्थाचा हवा तो आकार देता येईल असा लगदा बनवता येतो व नंतर भट्टीत टाकून तो कडक करता येतो. पॉलिमर क्लेचा वापर मानवी आकृत्या, बाहुल्या, मुखवटे व प्राणीपक्ष्यांच्या खर्‍याखुर्‍या वाटणार्‍या कलाकृती बनवण्यासाठी होतो.

जर्मनीतील बाहुल्या बनवणारी एक कलाकार कॅथी क्रूझ हिने 1939 साली पीव्हीसी रेझिन व प्लॅस्टिसाईझर यांचे मिश्रण करून पॉलिमर क्ले बनवली. काही प्रकारची पॉलिमर क्ले हवेत प्रदीर्घ काळ राहिल्यास आपोआप कडक बनते. 

या क्लेचे वैशिष्ट्य म्हणजे हिच्यापासून बनलेल्या बाहुल्या जिवंत भासतात. जे मातीपासून शक्य नसते. परंतु प्रदीर्घ काळ पॉलिमर क्लेचा वापर केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

संबंधित बातम्या
Back to top button