अद्भुत प्राणी फर्नांडिना कासव | पुढारी | पुढारी

अद्भुत प्राणी फर्नांडिना कासव | पुढारी

पृथ्वीवरून नामशेष झाली असे मानण्यात आलेली प्रजाती प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे आढळणे दुर्मीळ मानले जाते. फर्नांडिना कासवाच्या प्रजातीबाबत मात्र असे घडले आहे. फर्नांडिना कासव सुमारे 113 वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा मानवाला दिसले आहे. गालापागोस बेटावरील हे एक विशाल आकाराचे कासव आहे. याचे वजन सुमारे 400 किलो असते. 

या कासवाचे कवच एखाद्या घुमटाप्रमाणे गोलाकार असते आणि मान लांब व लवचिक असते. गालापागोस बेट समूहातील फर्नांडिना या बेटावर हे प्रथम आढळल्याने त्याचे नाव फर्नांडिना कासव असे पडले. दमट, उबदार वातावरण या कासवाला आवडते.

1906 नंतर या कासवाचे नामोनिशाण कोणाला आढळले नव्हते. तेल व मांसासाठी मोठ्या प्रमाणात शिकार केली गेल्याने हा प्राणी लुप्‍त झाल्याचे घोषित करण्यात आले. परंतु 2011 साली हे कासव पुन्हा आढळल्याने त्याची वर्गवारी लुप्‍तपासून लुप्‍त होण्याच्या धोक्यात असणार्‍या प्राण्यांच्या गटात केली गेली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button