क्रांतिकारक शोध : फर्मेटेशन | पुढारी | पुढारी

क्रांतिकारक शोध : फर्मेटेशन | पुढारी

फर्मेटेशन म्हणजे अन्‍न आंबवून ते अधिक स्वादिष्ट व टिकाऊ करण्याची पद्धत मानवाला पाषाणकाळापासून ज्ञात आहे. आदिमानवाला आंबट द्रवात मांसाला बुडवून ठेवल्यास ते अधिक काळ टिकते हे कळले. चीन, भारत व इजिप्‍त या देशांत अन्‍न आंबवण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्या. 

1837 साली थिओडोर श्‍वाश्‍न व 1857 साली लुई पाश्‍चर यांनी सिद्ध केले की दुधातील जिवाणूंमुळे दूध आंबते व कोणत्याही आंबवण्याच्या क्रियेला जिवाणू कारणीभूत असतात. जरी पाश्‍चरसारख्या शास्त्रज्ञांना आंबवण्याच्या क्रियेमागील रहस्य कळले तरी या क्रियेला कारणीभूत  (एंजाइम्स), उत्प्रेरके वेगळे करण्यात ते अयशस्वी ठरले. 1897 साली जर्मन केमिस्ट एडवर्ड बुकनर याला उत्प्रेरके वेगळी करण्यात यश मिळाले. या शोधामुळे जैवरसायन शास्त्राची वेगळी शाखा निर्माण झाली. 1907 साली बुकनरला या शोधाबद्दल नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संबंधित बातम्या
Back to top button