अजब-गजब : पाणघोड्याचे मटण | पुढारी | पुढारी

अजब-गजब : पाणघोड्याचे मटण | पुढारी

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन वसाहतीत मांस खायला मिळणे दुरापास्त झाले होते. अती शिकारीमुळे बायसन प्राण्याची कमी झालेली संख्या व गायी, मेंढ्या, कोंबड्या, डुकरे या प्राण्यांची रोडावलेली आयात यामुळे अमेरिकन लोकांना मांस मिळेनासे झाले. फ्रेडरिक रसेल बर्नहॅम या अजब वल्‍लीने पाणघोड्याचे मटण हाच या मांस समस्येवर उपाय असल्याचे स्वत:च ठरवले. पट्टीचा शिकारी असलेल्या बर्नहॅमने आफ्रिकेतून पाणघोडे आयात करून त्यांचे मांस खाण्यासाठी वापरावे असे अमेरिकन काँग्रेसला सुचवले. ‘लेक काऊ बेकन’ या नावाने हे मांस विक्रीस ठेवण्याचाही त्याचा इरादा होता. पाणघोड्याच्या आयातीला मंजुरी मिळावी म्हणून हिप्पो बिल हे विधेयकही बर्नहॅमच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये मांडले. हे विधेयक संमत न झाल्याने व इतर पाळीव प्राण्यांच्या मांस आयातीत वाढ झाल्यामुळे मांस दुष्काळ संपला. पाणघोड्यांच्या सुर्दैवाने त्याचे मटण अमेरिकन लोकांच्या आहाराचा मुख्य भाग कधीच बनले नाही.

संबंधित बातम्या
Back to top button