भारताच्या प्रागैतिहासिक इतिहासाचा शोधकर्ता  | पुढारी | पुढारी

भारताच्या प्रागैतिहासिक इतिहासाचा शोधकर्ता  | पुढारी

रॉबर्ट फूट या शास्त्रज्ञाबद्दल व त्याच्या कार्याबद्दल भारतात फारशी कोणाला कल्पना नाही. ‘भारतच मानवी संस्कृतीचा पाळणा आहे,’ असे ठणकावून सांगणारा हा शास्त्रज्ञ आता कोणाच्या स्मृतीत नाही. 1858 साली 24 वर्षांच्या रॉबर्ट फूटवर दक्षिण भारतात मौल्यवान धातू शोधण्याची कामगिरी ब्रिटिश सरकारने सोपवली. सोने व चांदी शोधणार्‍या रॉबर्टला त्याहीपेक्षा  मौल्यवान असा खजिना तामिळनाडू व कर्नाटकच्या गुहांत सापडला. त्याला हाताने बनवलेली एक दगडी कुर्‍हाड सापडली, जी सुमारे 33 लाख वर्षांपूर्वीची होती. 

सुमारे 53 हजार कि. मी. अंतर घोड्यावरून कापत रॉबर्ट याने आणखी पुरावे जमवले. दगडी हत्यारे, मातीची प्राचीन भांडी, धातूचे दागिने अशा अनेक प्रागैतिहासिक वस्तू त्याने शोधून काढल्या. त्यांची नीट वर्गवारी केली. आफ्रिकेतील आदिमानवाच्या कितीतरी अगोदर भारतात आदिमानव अस्तित्वात होता, असा निष्कर्ष त्याने काढला. यामुळेच भारताच्या प्रागैतिहासिक इतिहासाचा शोधकर्ता असा रॉबर्ट फूटचा सन्मानाने उल्लेख होतो.

संबंधित बातम्या
Back to top button