बालवीर : व्यंकटेश | पुढारी | पुढारी

बालवीर : व्यंकटेश | पुढारी

मान्सूनच्या जोरदार पावसाने कर्नाटक राज्यातील अनेक भागांत पूर आला होता. पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांची व स्वयंसेवकांची धावपळ सुरू होती. एक रुग्णवाहिका पुरातील पाण्यातून वाट काढत होती. त्या रुग्णवाहिकेत सहा मुले होती. एक पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रुग्णवाहिकेच्या चालकाला रस्त्याच्या अंदाज येईना. त्यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाता येईना. व्यंकटेश हा बारा वर्षांचा मुलगा त्या रुग्णवाहिकेला पुराच्या पाण्यातून बाहेर यायची वाट दाखवण्यासाठी सरसावला. 

जोरदार पाण्याच्या प्रवाहातून धावत जात व्यंकटेशने रुग्णवाहिकेला अचूक वाट दाखवली. व्यंकटेशच्या या साहसामुळे रुग्णवाहिकेतील सहा मुलांचे व रुग्णवाहिकेच्या चालकाचे प्राण वाचले. कर्नाटक राज्य सरकारने व्यंकटेशच्या या साहसाबद्दल त्याला पुरस्कार देऊन सन्मान केला. व्यंकटेश कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्याचा रहिवासी आहे.

संबंधित बातम्या
Back to top button