महात्मा गांधींची मंदिरे | पुढारी | पुढारी

महात्मा गांधींची मंदिरे | पुढारी

महात्मा गांधींचे पुतळे भारतातील शेकडो ठिकाणी आहेतच पण काही ठिकाणी चक्‍क मंदिरेही आहेत. तेलंगणा राज्यातील श्रीकाकुलम या गावात महात्मा गांधींचे एक मंदिर आहे. येथे महात्मा गांधींना देव म्हणून पुजले जात नाही तर उत्तम पीक यावे यासाठी मंदिरातील गांधी प्रतिमेची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पूजा केली जाते. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील सय्यद अपलास्वामी महाविद्यालयाच्या प्रांगणात असेच एक मंदिर बांधण्यात आले आहे. 

तेलंगणातही एक गांधी मंदिर आहे. महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालवण्यात येणार्‍या या मंदिरात महात्मा गांधींची एक मूर्ती आहे. येथील लोक महात्मा गांधींना ‘कलियुगातील देव’  मानतात. काही भाविक या मंदिरांना नियमित भेट देतात व गांधी मूर्तीची पूजा करतात. ओडिशातील संबळपूर येथे व कर्नाटकातील मंगळुरू येथेही गांधी मंदिरे आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button