मूल बोलताना अडखळतेय?, मुलांमधील तोतरेपणा, लक्षणे अन् उपचार

मूल बोलताना अडखळतेय?, मुलांमधील तोतरेपणा, लक्षणे अन् उपचार
Published on
Updated on

[author title="- डॉ जगदीश काथवटे" image="http://"][/author]

बर्‍याच वेळा आपल्या घरातील, आजूबाजूची लहान मुले छोटे-छोटे शब्द बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नुकतीच बोलायला शिकलेली मुले त्यांच्या बोबड्या आवाजात एक-दोन शब्द म्हणायला सुरुवात करतात, ते ऐकायला खूपच गोड वाटते. त्यापैकी काही मुले सुरुवातीची काही वर्षे बोबडे बोलतात. त्यानंतर हळूहळू त्यांचे उच्चार आणि भाषा स्पष्ट व्हायला लागते; मात्र काही वेळेस काही मुलांना आपण सांगितलेली गोष्ट समजत नाही आणि त्यांची भाषा व उच्चार स्पष्ट नसतात, तेव्हा मात्र समस्या निर्माण होऊ शकतात.

लहान मूल बोलताना अडखळणे किंवा तोतरेपणा ही लहान मुलांमधील एक सामान्य समस्या आहे. हा विकार मुलांच्या भाषाशैलीवर परिणाम करतो आणि त्यांच्या विकासात अडथळा निर्माण करतो. यामुळे मूल योग्यरीत्या संवाद साधण्यास आणि त्याच्या भावना किंवा मत व्यक्त करण्यास सक्षम नसते.

संवाद कौशल्यात येणार्‍या अडथळ्यांमुळे मूल कोणत्याही सामाजिक किंवा शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्यात रस दाखवत नाही. अशी मुले अनेकदा इतर मुलांशी संभाषण टाळण्याचा प्रयत्न करतात तसेच ते समाजात वावरण्यास संकोच बाळगतात.

लक्षणे

पुन्हा-पुन्हा तेच बोलणे, अर्धवट वाक्य तयार करणे, तुटक शब्द, अवघड शब्दांचा उच्चार टाळणे, मूठ दाबणे, बोलताना जास्त डोळे मिचकावणे, नैराश्य येणे किंवा संकोच बाळगणे. बर्‍याचदा कौटुंबिक इतिहास, स्ट्रोक किंवा मेंदूला दुखापत, ठरावीक औषधे आणि उच्च पातळीचा तणाव यामुळेदेखील संवादासंबंधी विकार आढळून येऊ शकतो. यासाठी वेळीच उपचार करणे आवश्यक ठरते.

निदान महत्त्वाचे

वेळीच उपचार केल्याने मुलाला आत्मविश्वास मिळतो आणि सार्वजनिक ठिकाणी निर्भयपणे बोलता येते किंवा कोणत्याही अडचणीशिवाय संवाद साधता येतो. याकडे लक्ष दिले नाही तर नैराश्य येणे, मानसिकरीत्या दडपण येणे तसेच नैराश्याचा सामना करावा लागतो.

उपचार

संवाद साधताना अडखळल्यामुळे मुलाच्या विकासात अडथळे येत असल्यास पालकांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संवाद कौशल्य वाढवण्यासाठी स्पीच थेरपी पर्याय निवडणे योग्य ठरते. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीदेखील मुलांना तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी, तोतरेपणाची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरते. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी ही आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणून मानसिक आजारांवर उपचार करण्यासठी अतिशय उपयुक्त आहे.

मुलांमधील तोतरेपणा

ही समस्या असलेल्या व्यक्ती वाक्याच्या सुरुवातीला अडखळतात, त्यांचे शब्द खेचले जातात किंवा पुन्हा पुन्हा उच्चारले जातात अथवा पहिलाच शब्द फुटत नाही, असे सर्वसाधारण दिसून येते. काहीजणांना बोलताना हाताची मूठ आवळण्याची सवय असते, तर काहींना पाय जमिनीवर दाबण्याची सवय असते. स्पीच थेरपीने अशा मुलांना जर एखादा ठरावीक शब्द म्हणण्यात किंवा त्याचा उच्चार करण्यात अडचण येत असेल, तर तो शब्द अर्धा-अर्धा तोडून त्याचा उच्चार करणे, तसेच तो वाचायला शिकवले जाते. हळूहळू या मुलांमधील उच्चार स्पष्ट होऊ लागतात.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news